पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी चौदा जाती ॥ ९२ ॥ ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मिठांशु । जे पुरे म्हणों नेदी ॥ ९३ ॥ तया पावळेयाही येतुलेवरी । गोडियेची आथि थोरी । मग हैं तंत्र अवधारीं । परमामृत साचें ॥ ९४ ॥ जें मंदराचल न ढाळितां । क्षीरसागरु न डहुळतां । अनादि स्वभावता । आइतें आहे ।। ९५ ।। जें द्रव ना नव्हे बद्ध | जेथ नेणिजती रस गंध । जें भलतयांही सिद्ध | आठवलेंचि फावे ॥ ९६ ॥ जयाची गोटीचि ऐकतखेवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेयां ॥ ९७ ॥ जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख | आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥ ९८ ॥ मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि टाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरें म्हणों न शके ॥ ९९ ॥ तुझें नामचि आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगती सुखाडें | आनंदाचेनि ॥ २०० ॥ आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥ १ ॥ हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वविळा । कां नित्य वाहतया गंगाजळा । पौरसेपण होऊनही जातात; ९२ जें अशा प्रकारचा क्षीरसमुद्रांतून निघालेला कोणीएक रस आहे, आणि जें < 'अमृत' म्हणजे ' अमरपणा देणारें' आहे, असा उगाच भ्रम लोकांत पसरला आहे, अशा त्या नामधारी अमृताचाही गोड अंश जर पुरेसा होत नाहीं, ९३ त्या इतक्या क्षुद्राचीही गोडी जर इतकी मान्यता पावते, तर मग तुमचें हें बोधवचन तर काय सांगावें ? हें तर प्रत्यक्ष परमामृतच आहे ! ९४ जें, मंदरपर्वताचा मंथा करून न फिरवतां व जें क्षीरसमुद्राला न घुसळतां, अनादि, स्वयंसिद्ध, आइतेंच आहे; ९५ जे पातळ नाहीं किंवा घट्टही नाहीं, ज्याच्या अंगीं रस किंवा गंध याची वार्ताही नाहीं, आणि जें स्मरण करतांच वाटेल त्याला आयतेंच सांपडतें; ९६ ज्याची गोष्ट ऐकताक्षणीच सर्व संसार निःसार होऊन, आपल्या ठिकाणीं नित्यता वज्रलेप होऊं लागते, ९७ जन्ममरणाची भाषाच समूळ नाहींशी होते, आणि आंत बाहेर सर्वत्र आत्मानुभवाचें महासुख वाढीस लागतें. ९८ मग असें हें परमामृत जर सुदैवानें अवचित सेवन करण्यास सांपडलें, तर तें तत्काळ जीवाला आत्मस्वरूप करून सोडते; म्हणून तें अमृत तुम्ही मला पाजीत असतां, माझ्या चित्तानें ' पुरे' म्हणावें, हें शक्यच नाहीं. ९९ देवा, तुमचें नुसतें नांवही आम्हांला गोड वाटतें, तशांत तुमची प्रत्यक्ष गांठ पडते आणि सलगीही होते, शिवाय तुम्ही आनंदाच्या भरतीने आमच्याबरोबर गोष्टीही बोलतां २०० तेव्हां, देवा, आतां हें परमसुख कशासारखें आहे म्हणून सांगावें ? माझ्या अंतःकरणाला इतका परम संतोष झाला आहे, कीं, वाचेनें याचें वर्णनच करवत नाहीं ! परंतु इतकें मात्र मला समजतें कीं, या परमामृताची तुमच्या मुखानें पुनरावृत्ति व्हावी. १ अहो, प्रतिदिवस तोच सूर्य उगवतो, म्हणून त्याला कोणी 'कालचाच शिळा ' म्हणतें काय ? सर्वाना पावन करणाऱ्या १ झाला. २ शिळेपण, अंग न धुतलेली स्थिति.