पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३२७ कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् । केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥ सम० - योगेश्वरा कसें तूतें जाणों मी चिंतितां सदा । आहेसि चिंतना योग्य तूं रूप कोणकोणत्या ॥ १७ ॥ आर्या - चिंतुनि तुजला कैसें जाणावें म्यां मनांत यदुवंशा । कोण्या कोण्या भावीं चिंतू कैशा तुझ्या विशिष्टांशा ॥ १७ ॥ ओवी - योगेश्वरा ! तुझें चिंतन करितां । तुज कैसिया रीतीं जाणणे ? अनंता ! | तुझें ध्यान कोणे स्थळ आतां । तें भगवंता सांगें मज ॥ १७ ॥ जी कैसें मियां तें जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें । जरी तूंचि म्हणों आघवें । तरी चिंतनचि न घडे ॥ ८७ ॥ म्हणोनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें । आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें ॥ ८८ ॥ जया जया भावाचिया ठायीं । तूतें चिंतितां मज सायासु नाहीं । तो विवेळ करूनि देई । योग आपुला ॥ ८९ ॥ विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन । भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८॥ सम० – विस्तारें आपुला योग विभूतीहि जनार्दना । मागुती सांग मी तृप्त नव्हें या श्रवणामृतें ॥ १८ ॥ आर्या - आपुल पुन्हा सविस्तर विभूति अणि योग सांग बहुधा तो । तुझिया वचन सुधेच्या श्रवर्णे माझाहि जीव बहु धातो ॥ १८ ॥ ओवी - तुझ्या विभूति आत्मयोग विस्तारेंकरून । वेळोवेळां ऐकतां होय अमृतपान । हें मज प्रसन्न होऊन । सांग स्वामी जनार्दना ! ॥ १८ ॥ आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती । एथ म्हणसी जरी पुढतीं । काय सांगों ॥ ९९० ॥ तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना । पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जेवीं ॥ ९९ ॥ जें काळकूटाचें सहोदर । जें मृत्युभेणें प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । देवा, मी तुम्हाला कसें जाणावें, आणि काय जाणून तुमचें चिंतन करावें ? हें सर्व विश्व तुम्हीच आहां, असें म्हणावें तर चिंतन घडण्याला जागाच राहात नाहीं ! ८७ म्हणून तुम्हीं आतां नुकतेच आपले 'भाव' जसे संक्षेपानें सांगितले, तसेंच आतां एकदा विस्तारपूर्वक विवेचन करा. ८८ ज्या ज्या भावाच्या द्वारें तुमचें चिंतन करणे मला जड जाणार नाहीं, तो तो आपला भाग अगदीं पट करून, मला तुमची प्राप्ति घडूं द्या. ८९ हे भूतमात्राच्या अधिपते श्रीकृष्णदेवा, मी ज्या तुमच्या विभूति विचारल्या आहेत, त्या सर्व सांगा. यावर तुम्ही कदाचित् म्हणाल, कीं, 'एकदां विभूति सांगितल्या, त्याच पुन्हां कशाला सांगा ?' १९० पण, देवा, या शंकेला तिळमात्रही जागा देऊं नका; कारण यःकश्चित् अमृताच्या पानालाही जसे मनुष्य नाहीं म्हणत नाहीं; ९१ आणि तें अमृत तरी कसें? तर जें हालाहल विषाचें भावंड आहे ! आणि मृत्यूला भ्यायलेले देव अमर होण्याकरितां जें प्यायले, परंतु ज्याचें पान करूनही ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत चवदा इंद्र अमरराजाच्या सिंहासनावर बसतात आणि नष्ट १ संक्षेपाने, २ स्पष्ट, ३ दिवसाचे ४ इंद.