पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥ परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेविं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदय ओळखिला । होय म्हणोनि ॥ ६१ ॥ तैसीं व्यासादिकांची बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा ॥ ६२ ॥ सर्वमेततं मन्ये यन्मां वदसि केशव। न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥ सम० - हें सर्व सत्य वाटे जें केशवा मज सांगसी । भगवंता तुझी व्यक्ती नेणती देव दानव ॥ १४ ॥ आर्या - वदसि केशवा मज तें मी अवघेंहि मानितों साच । व्यक्ती सुरासुर तुझी नेणति भगवंत अससि ऐसाच ॥१४॥ ओवी - सर्वही तुवां मज सांगितलें । तितुकें मज साच मानवलें । भगवंता ! ज्ञान उपजलें । देवदानवां न कळे कीं ॥१४॥ ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले । तयां आघवयांचेंचि फिटलें । अनोळखपण || ६३ || जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल | माजी हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठिले || ६४ || अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरितां । मी महोदधि जाहलों अनंता । संवादसुखाचा ॥ ६५ ॥ प्रभु आघवेन येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें | तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्गुरु तुवां ॥ ६६ ॥ न्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदां तें कानीं आइकें । परि कृपा न विजेचि तुवां एकें | तंव नेणवेचि कांहीं ॥ ६७ ॥ म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ | जालिया केले उद्यम सदां सफळ | तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥ ६८ ॥ चालत येऊन, नेहमी तुझ्या स्वरूपाचें यथास्थित वर्णन करीत असत, १६० परंतु अंधारांत हातीं लागलेला चिंतामणि जसा 'हा चिंतामणि नव्हे,' असे म्हणून फेंकून द्यावा, आणि मग दिवस उगवला म्हणजे त्या प्रकाशांत त्याचे स्वरूप ओळखून ' ' हा चिंतामणिच !' असें म्हणावें, ६१ तशा त्या व्यासादिकांच्या वाणी ज्ञानरत्नांच्या केवळ खाणीच होत्या; परंतु, अहो, श्रीकृष्णमहाराज, तुम्ही जे सूर्यासारखे आहां, त्या तुमचा प्रकाश नसल्यामुळे, त्या असून नसल्यासारख्याच झाल्या होत्या. ६२ परंतु आतां तुझे वाक्यरूपी किरण पसरल्यामुळे, त्या ऋषींनीं कथन केलेल्या मार्गाची ओळख पद्मं लागली आहे. ६३ देवा, त्यांची वचनें म्हणजे ज्ञानाचे बीज, तें हृदयरूपी भूमींत खोल पडलें होतें. आतां त्यावर आपल्या प्रसादाचा ओलावा झाल्यामुळे, तें रुजून त्याला एकवाक्यतारूपी फळ आले आहे. ६४ अहो, नारदप्रभृति संतांच्या वचनोक्ति या नद्यांसारख्या होत्या; पण, त्यांच्याच द्वारें मी आज एकवाक्यतेच्या सुखाचा अपरंपार सागरच झालों आहें. ६५ हे प्रभो, मी या जन्मांत जीं जीं कांहीं उत्तम पुण्यें संपादन केलीं असतील, त्यांच्या अंगीं, हे सद्गुरो, तुम्हीं जें द्याल, तें देण्याचें मुळींच सामर्थ्य नाहीं. ६६ नाहींतर, वडील माणसांच्या तोंडून तुमचा महिमा किती वेळां तरी मी ऐकिला होता. परंतु तुमची एकट्याची कृपा जोपर्यंत झाली नव्हती तोंपर्यंत मला कांहींच समजत नसे. ६७ म्हणून ज्याप्रमाणं देव अनुकूळ असले, म्हणजे जो जो उद्योग करावा तो तो आपला सफळच होतो, त्याप्रमाणे ऐकलेले व पढलेले ज्ञान गुरुकृपेनेंच फळाला येतें. ६८ अहो, माळी जिवापाड श्रम