पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३२५ जी बनकर झाडें सिंपी जिवेंसाटीं । पाहूनि जन्में काढी आंटी । परि फळेंमी तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ॥ ६९ ॥ अहो विपमा जैं वोट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे । पैं रसायनें तैं गोडें । आरोग्य देहीं ॥ १७० ॥ कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचें तोंचि सार्थकपण । जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं ॥ ७१ ॥ तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें | तें तेंचि म्हणों ये आपुलें । जें सानुकूल श्रीगुरु ॥ ७२ ॥ ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचीं नाचतसे भोजें । तेवींच म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें || ७३ || तरि साचचिसे हैं कैवल्यपती | मज त्रिशुद्धी आलें प्रतीति । जे तूं देवदानवांचिये मती - | जोगा नव्हसी ॥ ७४ ॥ तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा । तो कहींचि नोहे हैं मद्भावा । भरंवसेनि आलें ॥ ७५ ॥ स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५ ॥ सम०—प्रकाशै स्वस्वरूप तूं जाणसी पुरुषोत्तमा । भूतपालक भूतेशा देवदेवा जगत्पती ॥ १५ ॥ आर्या - आपणचि आपणा तूं जाणसि बापा स्वयें सुराधीशा । भूतोद्भवकर देवा भूतेशा देवदेव जगदीशा ॥ १५ ॥ ओवी — तूं आपआपणातें आत्मा । जाणसी, तूं पुरुषोत्तमा ! । भूतभावन हे महिमा । देवाधिदेवा ! आहे तुझी ॥१५॥ एथ आपुलें वाढपण जैसें । आपणचि जाणिजे आकारों । कां मी येतुली घनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे ॥ ७६ ॥ तैसा आपुलिये सर्वशक्ति । तुज तूंचि जाणसी लक्ष्मीपती । येर वेदादिक मति । मिरवती वांया || ७७৷৷ हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें । आदिशून्य तरोनि करून जन्मभर झाडें शिंपतो, पण जेव्हां वसंतकाळ येतो, तेव्हांच फळ हाताला लाभतें. ६९ महाराज,. जेव्हां विषमज्वर नाहींसा होतो, तेव्हांच गोडाची गोडी अनुभवास येते. जेव्हां रोग नाहींसा होतो, तेव्हांच रसायनाचें गोडपण मनाला पटते. १७० इंद्रियें, वाचा, आणि प्राणवायु यांच्या जन्माचें सार्थक केव्हां होतें ? तर जेव्हां त्यांच्यांत चैतन्याचा संचार होतो तेव्हांच ७१ तसेंच जें वाङ्मय आपण यथेच्छ धुंडाळलें, किंवा जो योगादिकांचा आपण अभ्यास केला, तें सर्व खरोखर आपल्या पदरांत केव्हां पडते ? तर जेव्हां श्रीगुरुराज कृपा करतील तेव्हां. "" ७२ अशा प्रकारें आत्मानुभवानें रंगलेला अर्जुन निःशंक होऊन बाहुल्यासारखा नाचूं लागला, आणि एकसारखा बोलूं लागला, कीं, "देवा, तुमचें वचन माझ्या मनाला पूर्णपणे पटलें खरें ! ७३ हे परब्रह्मरूपा श्रीकृष्णा, माझी आतां पूरापूर खात्री झाली आहे, कीं, देवदानवांच्या बुद्धीलासुद्धां तुझें खरें स्वरूप आकळतां येणार नाहीं. ७४ तुमचे बोधवचन प्रकट न लाभतां जो आपल्या बुद्धीच्या बळावर ज्ञानाला गांडं पाहील, त्याची खास निराशा होईल, हे आतां माझ्या चांगले प्रत्ययास आले आहे. " ७५ जसे आकाशाचे विस्तृतपण आकाशालाच समजते किंवा पृथ्वीच्या घट्टपणाचें माप पृथ्वीलाच करतां येतें, ७६ तसेंच, लक्ष्मीनाथा, आपल्या स्वतःच्या अपार शक्तीचं सर्व परींनीं आकलन करणें केन्द्र तुम्हांलाच शक्य आहे. इतर जे वेद इत्यादि आहेत, त्यांची बुद्धि या विषयांत उगीच प्र मिरविते. ७७ अहो, मनाला वेगांत मागें टाकावें, किंवा वान्याला कवेंत पकडावें, आणि आदिशून्य १ जिवापाड २ श्रम.