पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३२३ पंचविसावा | दिव्य तूं प्रकृतिभावा । पैलीकडील ।। १५० ।। अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मी । तो तूं हें आम्हीं । जाणितलें आतां ॥ ५१ ॥ तूं या कालत्रयासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाधात्री । हें कळलें फुडें ॥ ५२ ॥ आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा । असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥ सम० - ये रितीं म्हणती तूतें ऋषि देवर्षि नारद । देवल व्यास असित स्वयँही सांगसी मज ॥ १३॥ आर्या-या परि सांगसि तूंही वदति सकळ ऋषिहि तूज दिव्यास। देवऋषी नारद तो देवल असितहि तसा मुनी व्यास १३ ओंवी — हें मज सांगितलें ऋषीश्वरीं सर्व । देवर्षि नारदादिक देव । असित देवल व्यासादिक देव । तेंच स्वयं तूं सांगसी १३ पैं आणिकही एके परी । प्रतीतीची येतसे थोरी | जे मागें ऐसेंचि ऋपीश्वरीं । सांगितलें तूतें ।। ५३ ।। परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥ ५४ ॥ न्हवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनीं गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ॥ ५५ ॥ हां गा आंधळेयांच्या गांवीं । आपणपें प्रगटिलें रखी । तरि तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाश कैंचा ॥ ५६ ॥ तेवीं देवर्षि अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसी जे मधुरता । तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं ॥ ५७ ॥ पैं असितादेवलाचेनि मुखें । मी एवंविधा तूतें आइकें । परि तैं बुद्धि विपविखें । धारिली होती ॥ ५८ ॥ विपयविपाचा पडिपाई | गोड परमार्थ लागे कडू । कडू विषय तो गोड । जीवासी जाहला ॥ ५९ ॥ आणि हैं आणिकांचें काय सांगावें । राउळा पुराणपुरुष, तें आपणच आहां. तुम्हीं मायेच्या टप्प्यापलीकडचे आहां. १५० जो स्वयंसिद्ध विश्वाचा स्वामी, ज्याला जन्मबंध कधीही बसत नाहीं, तोही आपणच आहां. हें आतां मला समजले. ५१ भूत, वर्तमान, भविष्य, या तीन्ही काळांचे तुम्हीच सूत्रधार आहां; या जीवात्म्याचे अधिपति तुम्हीच; तुम्हीच या ब्रह्मांडाचे पालक; हें आतां मला स्पष्ट कळले आहे. ५२ 1 या ज्ञानाचा पडताळा आणखीही एक रीतीनें पटतो. कारण, मागें श्रेष्ठ ऋपिजनांनींही तुझें असेच वर्णन केले आहे. ५३ पण त्यांनी केलेल्या वर्णनाचें सत्यत्व माझ्या मनाला आतां पटत आहे, आणि हें सर्व, देवा, तुमच्या प्रसादाचें फळ आहे. ५४ नाहीं तर, नारद नेहमीं आमच्याजवळ येऊन हे गाणं गात असे; परंतु त्याचा अर्थ न समजल्यामुळे, आम्हांला नुसती गायनाच्याच सुखाची गोडी लाभत असे. ५५ अहो, आंधळ्यांच्या गांवीं सूर्य आला, तर त्या आंधळ्यांनीं त्याच्या किरणाची नुसती तिरीपच उपभोगावी, त्यांना प्रकाशाचा अनुभव कसा येणार ? ५६ तसें नारदांनीं अध्यात्मविषयक गाणें गायिलं असतां, रागरागिणीच्या द्वारं वरवर जी गोडी उत्पन्न व्हावी, तीच आमच्या चित्ताला रुने, दुसरें कांहींच कळत नसे. ५७ असित आणि देवल या ऋषींच्या तोंडूनही तुझें हें स्वरूपवर्णन आम्हीं ऐकिलें होतें, परंतु आमची मनोवृत्ति विषयविषाने घेरलेली होती. ५८ या विषयविपाचा जोर इतका होता, कीं, गोड अध्यात्मही कडू लागे, आणि कडू विषयही गोड वाटत. ५९ आतां इतरांच्या कथा कशाला पाहिजेत ? प्रत्यक्ष व्यास महर्षि हेही आमच्या घरीं १ तिरीप. २ गुंगलेली, ३ जोर, प्रताप.