पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । एक मीवांचूनि वावो | येर मानिलें जिहीं ॥ ४१ ॥ तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा | मग मीचि होऊनि दिवेटा | पुढां पुढ चालें ॥ ४२ ॥ अज्ञानाचिये राती | माजीं तमाची मिळणी दाटती । ते नाशनि घाली परौती । तयां करीं नित्योदयो ॥ ४३ ॥ ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें | बोलिलें जेथ पुरुषोत्तमें | तेथ अर्जुन मनोधर्मै । निवालों म्हणतसे ॥ ४४ ॥ हांहो जी अवधारा । भला रु फेडिला संसारा । जाहला जननी जठरजोहरी-1 वेगळा प्रभु ॥ ४५ ॥ जी जन्मलेपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें । जीवित हाता चढलें । आवडतसें ॥ ४६ ॥ आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया देवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ॥४७॥ आतां येणें वचनतेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें । म्हणोनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ॥ ४८ ॥ अर्जुन उवाच - परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् । पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२ ॥ सम० – परब्रह्म अधिष्ठान तूं तो अत्यंत पावन । आत्मा शाश्वत जो दिव्य आदिदेव अज प्रभु ॥ १२ ॥ आर्या- तूंचि परब्रह्म विभू पुरुष परंधाम दिव्य शाश्वत तूं । अज आदी अव्यय तूं परम पवित्रहि जगत्पटी तंतू ॥ १२ ॥ ओवी - अर्जुन म्हणे अगा परब्रह्मा । पवित्र तूं परंधामा । सत्य पुरुष शाश्वतनामा । आदिदेव तूं नित्य प्रभू ॥ १२ ॥ तरी होसी गा तूं परब्रह्म तूं परम | जगन्नाथा ॥ ४९ ॥ । जें या महाभूतां विसवतें धाम | पवित्र तूं परमदैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी म्हणून माझ्या आत्मस्वरूपाचें अस्तित्व ज्यांनीं आपल्या जीविताचा आसरा केलें, आणि एकट्या माझ्यावांचून ज्यांनी दुसऱ्या कशावरही श्रद्धा ठेवली नाहीं, ४१ अर्जुना, त्या श्रेष्ठ तत्त्वज्ञांकरितां दिवसास कापराची मशाल पेटवून व मी स्वतः मशालजी होऊन त्यांच्या पुढें पुढें चालतो. ४२ अज्ञानाच्या रात्रीत जो दाट अंधकार भिनतो, त्याचा निरास करून, मी त्यांच्यासाठी अक्षय प्रकाशाचा उदय करतों. " ४३ प्रेमळ भक्ताचें प्रेमनिधान जे श्रीकृष्ण, ते जेव्हां असें बोलले, तेव्हां अर्जुन म्हणाला, " मी अगदी मनोभावानें तृप्त झालों आहें. ४४ हे प्रभो, ऐकावें. माझा संसाररूपी कर तुम्ही साफ झाडून टाकला आहे. मी आतां जन्ममरणाच्या आगीपासून मुक्त झालों आहे ! ४५ माझ्या जन्माचें खरें मर्म आज समजलें, आणि माझ्या जीविताचे आज सार्थक झालें असे मला वाटतें. ४६ आज माझं आयुष्य कृतकार्य झालें ! आज माझें सुदैव उघडलें ! कारण परमेश्वराची प्रसादवाणी आज माझ्या कानीं आली. ४७ आतां या वाणीच्या प्रकाशानें माझें भ्रमपटल अंतर्बाह्य दूर झालें आहे, आणि म्हणून तुमच्या स्वरूपाचें खरें दर्शन मला घडत आहे. ४८ पण, जे या विश्वाला विसाव्याचें स्थान होतें, तें परब्रह्म तुम्हीच आहां. हे जगन्नाथा, तुम्ही परम पवित्र आहां. ४९ ब्रह्मा, विष्णु, महेश, या तीन देवांचे तुम्हीच दैवत आह; पंचविसावें तत्त्व जो १ कापराची मशाल. २ मशालजी ३ जोहर लाक्षागृह, आगीचें घर.