पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला ७ म्हणौनियां ।। ६६ ।। हें अनावर न विचारितां । वायांचि वेिसा उपनला चित्ता । येन्हवीं का भानुतेजीं खद्योता । शोभा थी ।। ६७ ।। कीं टिटिभू चांचूवरी । माप ये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्ते येथ ॥ ६८ ॥ आयका आकाश गिवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि पाइ हें आघवें । निर्धारितां ।। ६९ ।। तया गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी | चमत्कारोनी ॥ ७० ॥ तेथ हरु म्हणे नेणिजे | देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ॥ ७१ ॥ हा वेदार्थसागरु | जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥ ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काय होयें ॥ ७३ ॥ हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ॥ ७४ ॥ परी एथ असे एक आधारू । तेणेंचि बोलें मी सधरु । जैं सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥ येन्हवीं तरी मी मूर्खु । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥ ७६ ॥ लोहाचें कनक होये । हैं सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी ॥ ७७ ॥ जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती । म्हणून तें स्पष्टीकरण सावधपणें श्रवण करा अशी प्रार्थना आहे. ६६ हें कार्य आवरण्यास किती कठिण आहे याचा विचार न करितां भलती धिटाई माझ्या मनानें केली आहे; नाहीं तर सूर्याच्या तेजापुढें काजव्याची मातब्बरी ती काय ? ६७ किंवा टिटवीने आपल्या चोचीनें समुद्राचें माप करण्यासारखेंच म्यां अज्ञानाने या कार्याला प्रवृत्त होणें आहे. ६८ शिवाय असें पहा, कीं, आकाशास कव्यांत पकडावयाचे असेल, तर पकडणारानें आकाशाहून थोर झाले पाहिजे. तेव्हां, विचार केला म्हणजे मीं हातीं घेतलेलें हें कार्य केवळ आवांक्याच्या बाहेरचें आहे. ६९ त्या गीतार्थाच्या खोलपणाचें विवरण शंकर स्वतः करीत असतां, कांहीं चमत्कार वाटून पार्वतीने प्रश्न केला. ७० तेव्हां शंकर म्हणाले, " हे भवानी, तुझ्या स्वरूपाप्रमाणेच हें गीतातत्त्व अज्ञेय व नित्य नूतन आहे !" ७१ ज्याच्या निद्रा- वस्थेतील घोरणंही वेदार्थाचा विस्तार पावलें, तो सर्वेश्वर आदिनारायणच स्वतः हें गीतारहस्य सांगता झाला. ७२ तेव्हां जें कार्य एवढे अमर्याद आहे, जेथें वेदांचीही मति खुंटली, तेथें अल्प व अत्यंत मंद असा जो मी त्या माझा काय पाड ? ७३ हैं निर्मर्याद गीतातत्त्व कसें आटोक्यांत यादें ? या प्रचंड अलौकिक तेजाला कोणी घुसळावें ? आणि चिलटाने आकाशाला आपल्या मुठींत कसें बरं ठेवावें ! ७४ परंतु अशा स्थितीतही ज्याच्या योगें मी स्वतःला बलवान् समजतों, असा एक आधार आहे, तो हा, कीं, श्रीगुरु निवृत्तिनाथ मला अनुकूल आहेत, असें मी ज्ञानदेव म्हणतों. ७५ सामा- न्यतः जरी मी मूर्ख व विवेकहीन असलों, तरी संतकृपेचा दिवा तेजस्वी व स्पष्ट आहे. ७६ लोखं- डा सोने होते, अशा प्रकारची शक्ति एका परिसांतच आहे, किंवा मृताला पुन्हां जीव यावा, अशी कार्यसिद्धि अमृत करूं शकते. ७७ जर प्रत्यक्ष सरस्वतीच प्रसन्न झाली, तर मुक्याला वाचा फुटते, १ रु. २ आहे. ३ घालते. ४ कवटाळावे. ५ अशक्य, आटोक्याबाहेर. ६ धरावें.