पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३२१ तिहींचि म्हणिपे ॥ ३२ ॥ आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळे वाढे । आणि काळाची दृष्टि न पडे । हें आम्हां करणें ॥ ३३ ॥ लळेयाचिया वाळका किरीटी | गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥ ३४ ॥ तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाच्या करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी | पोषित मी जायें ॥ ३५ ॥ जिये पदवीचेच पोपकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें | आवडे करूं || ३६ || पैं गा भक्तासि माझें कोड | मज तयाचे अनन्यगतीची चाड । कां जे प्रेमळांचें सांकड | आमुचिया घरीं ॥ ३७ ॥ पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले | दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले | आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें । लक्ष्मियेसी ॥ ३८ ॥ परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळालागी देख | ठेविलें जतन ।। ३९ ।। हा ठावोवरी किरीटी | आम्ही प्रेमळ घेवों आपणयासाठीं । या बोलीं बोलिजत गोठी । सिया नव्हती गा ॥ १४० ॥ i तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्था ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥ सम० - ज्ञानदीपें कृपेनें मी त्यांचेचि तम नाशितों । अज्ञानें जे जडभ्रांती ज्ञानार्के तीस नाशितों ॥ ११ ॥ आर्या - मी हृदयस्थ तयांच्या करुणेनें ज्ञानदीप लावोनी । देतों आत्मसुखातें अज्ञानातें लयासि नेवोनी ॥ ११ ॥ ओवी - तयां उपजलिया अज्ञान अंधकार । त्यांवरी मी कृपा करीं करुणाकर । ज्ञानदीप हा सोज्ज्वळ निरंतर । अज्ञान नाशी तयांचें ॥ ११ ॥ द्यावयाचें, तेंही त्यांनीच सिद्ध केलेलें असतें, असें म्हटलें पाहिजे. ३२ आतां इतकेंच बाकी राहातें, कीं, हें प्रेमसुख चढतें वाढतें राहील आणि काळाची दृष्ट त्याला लागून ते विटणार नाहीं, एवढी व्यवस्था आम्हीं करावयाची. ३३ अर्जुना, आपल्या लाडक्या बाळाला स्नेहपूर्ण दृष्टीची ओढणी लावून आई, तो खेळत असतां, त्याच्या पाठोपाठ धांवते, आणि मग तो ज्या ज्या खेळण्याची आवड दाखवील, तें तें खेटणें ती माउली आपल्या सोनुल्यापुढे मांडते, त्याप्रमाणें उपासनेची प्रौढी ज्यानें पोसली जाईल, तें तें मी करतों. ३५ उपासनेच्या प्रौढीच्या पोषणाने ते सहज निरपवाद मला येऊन पोचतील, अशी व्यवस्था करणें, हें मला तर अगदीं अगत्यच आहे. ३६ अरे, भक्ताला माझ्याविषयीं लडिवाळ प्रेम असतें, आणि मलाही त्याच्या अनन्यचरणागतीची बूज राखावी लागते, कां कीं प्रेमळ भक्तांचें संकट म्हणजे आमच्या घरावरचेंच संकट ! ३७ मग स्वर्ग व मोक्ष हे दोन प्रसिद्ध मार्ग आम्ही त्यांच्या सेवेला लावतों, इतकेंच नव्हे तर लक्ष्मीसकट आम्ही आपले सर्व शरीरही त्यांच्या काजी खर्ची घालतों. ३८ परंतु देहापासून वेगळें असें जें एक निरंतर ताजें राहाणारें आत्मसुख, तें मीं आपल्या केवळ प्रेमळ भक्ताकरितां म्हणूनच स्वतंत्र राखून ठेवलेलें असतें. ३९ या सुखाच्या मर्यादेपर्यंत आम्ही आपल्या प्रेमळ भक्तांना आपल्याजवळ आवडीने नेतो; परंतु ह्या गोष्टी शब्दांनी बोलून दाखविण्यासारख्या नाहींत. १४० १ राखण तरतूद. २ प्रसिद्ध. ४१