पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२० सार्थ श्रीज्ञानेश्वरी दोनी वोघ ॥ २३ ॥ तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाले ॥ २४ ॥ तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ॥ २५ ॥ पैं गुरुशिष्यांचिया एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती संघ ॥ २६ ॥ जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणे । दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥। २७ ॥ तैसेंचि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोपें कथं विरसत । मग तया विसरामाजी विरत । आंगें जीवें ॥ २८ ॥ ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो' जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ॥ २९ ॥ तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥ सम० -तयां ऐशा सदा युक्तां भजतां प्रीतिपूर्वक । देतों तो मी बुद्धियोग ज्यार्णे ते मज पावती ॥ १० ॥ . आर्या- ते नित्ययुक्त मातें प्रीतीनें भजति त्यां सकामांतें । तो बुद्धियोग देतों पावति जेगें धनंजया मातें ॥ १० ॥ ओंवी – ऐसें निरंतर भक्तियुक्त। ते प्रीति करोनि मज भजती अत्यंत । तयांसि योगज्ञान देईन बहुत । जेर्णे ते मज पावती १० तयां मग जें आम्ही कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥ १३० ॥ कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा | स्वर्गापवर्ग ॥ ३१ ॥ कां म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परि आम्हीं देयावें हेंहि केलें । जलप्रवाह एकमेकांत घुसावे, २३ तसें भक्तियोगयुक्तांच्या भेटींत समरसपणाचें पवित्र प्रयागतीर्थ बनतें, आणि त्या तीर्थजलावर सात्त्विक भावाचें उसाण येऊन, ते एकत्वाच्या चव्हाट्याचे अध्यक्ष होतात. २४ नंतर त्या आत्मानंदाच्या अत्यंत सुखानें उचंबळलेले ते भक्तियोगी देहभानाची मर्यादा सांडून, माझ्या लाभानें पूर्ण समाधान पावून मोठमोठ्यानें घोष करूं लागतात. २५ गुरु एकांतांत ज्या मंत्राक्षराचा उपदेश शिष्याला करतात, त्याचीच घोषणा ते उघड उघड सर्वादेखत मेघगर्जनेप्रमाणें करतात. २६ जशी कमळाची कळी पूर्ण दशेला आली म्हणजे तिला आपला मधुरस आंतल्या आंत दावून 'ठेवतां येत नाहीं, आणि ती राजापासून रंकापर्यंत सर्वांना सुगंधाची मेजवानी देते, २७ त्याप्रमाणेच ते आपल्या आनंदातिशयानें विश्वांत माझा घोष करीत असतांना, त्या कीर्तनघोषानें उत्पन्न होणाऱ्या संतोषानें इतके भारून जातात की अखेर ते कीर्तन विसरून स्तब्ध होतात आणि त्याच विस्मृतीत तनुमनानें विरून जातत. २८ या प्रेमाच्या अतिरेकानें त्यांना रात्रीदिवसाचेंही भान राहात नाहीं. अशा प्रकारें ज्यांनी माझ्या स्वरूपलाभाचें निर्दोष संपूर्ण सुख आपलेंसें केलें आहे, २९ त्यांना मग आम्ही जें कांहीं द्यावें, त्याचा अगदीं निवडक भाग त्यांनीं पूर्वीच आपल्या स्वाधीन करून घेतलेला असतो. ५३० कां कीं ज्या वाटेनें ते चालत असतात, त्या वाटेची एकंदर व्यवस्था पाहिली, तर स्वर्ग व मोक्ष यांच्या वाटा केवळ आडवाटाच ठरतात. ३१ म्हणून त्यांनीं जें प्रेम आपल्या अंतःकरणांत सांठवलें असतें, तेंच आम्हीं त्यांस देण्याचें योजलेलें असतं; पण आम्हीं जें हें १ दिवस.