पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३१९ आणि तयां जळचि आश्रयो तरंगां । जीवनही जळ ॥ १३ ॥ ऐसें आघवाचि ठायीं । तया जळचि जेविं पाहीं । तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ॥ १४ ॥ ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परि साचोकारें उदितें | प्रेमभावें ॥। १५ ।। देश काळ वर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायु होऊनि गगन | गगनींचि विचरे ॥ १६ ॥ ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्पा मनीं । सांठऊनि मातें ॥ १७॥ जें जें भेटे भूत। तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चित | जाण माझा ॥ १८ ॥ मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् । कथयन्तश्च मां नित्यं तुप्यन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥ सम० - माझ्या ठायीं प्राण चित्त बोधिती जें परस्परें । वर्णिती सर्वदा मातें संतोपें गाति नाचती ॥ ९ ॥ आर्या-वर्णिति संतत मातें परस्परें बोधिती सुधीर मती । मजवरि चित्त प्राणहि ठेविति संतोषती सुधी रमती ॥ ९ ॥ ओंवी - माझे ठायीं चित्त ठेऊनी । माझी गाथा करूनी । राहे संतोषी होऊनी । गात नाचत ॥ ९ ॥ चित्तें मीचि जाहाले | मियांचि प्राणें धाले । जीवों मेरो विसरले । बोधाचिया भुली ॥ १९ ॥ मग तया वोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे | बोधचि वरी ॥ १२० ॥ जैशीं जवळिकेचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें । मग तरंगांसि धवळारें । तरंगचि होती ॥ २१ ॥ तैसी ये येरांचिये मिळणी । पडत आनंदकलोळांची वेणी । तेथ वोध बोधाची लेणीं । वोधेंचि मिरवी ॥ २२ ॥ जैसें सूर्ये सूर्यातें बोंवाळिलें । कीं चंद्र चंद्रम्या क्षेम दिधलें । ना तरी सरिसेनि पाडें मीनले । होत; १३ अशा प्रकारें सर्व परींनीं जशा पाण्यावांचून लाटा असूच शकत नाहींत, त्याप्रमाणें माझ्यावांचून वेगळें असें या विश्वांत कांहींच नाहीं. १४ अशा माझ्या विश्वव्यापक स्वरूपाला जाणून जे माझें कोठेंही भजन करतात, पण तें भजन खऱ्याखऱ्या उदय पावलेल्या प्रेमभावानें करतात; १५ देश, काळ, वर्तमान, इत्यादि सर्व माझ्यापासून अभिन्न मानतात आणि जसा वारा गगनरूप होऊन गगनांत संचार करतो, तसे जे, जगद्रूप जो मी त्या मला मनांत सांठवून, आत्मज्ञानानें त्रिभुवनांत सुखानें रममाण होतात; १६,१७ जें जें भूतमात्र भेटेल, तें तें भगवंत मानावें, हाच माझा खराखरा भक्तियोग होय, हें निश्चित समज. १८ I ज्यांचें चित्त महप झाले, माझ्या स्वरूपाने ज्यांच्या अंतःकरणाला अत्यंत समाधान झालें, आणि आत्मबोधाच्या नादाने जे मन्ममरणाला विसरले, १९ मग ते त्याच आत्मबोधाच्या वाढत्या प्रभावानें अद्वैतानंदाच्या सुखांत नाचूं लागतात, आणि आत्मबोधाचेंच 'देवाण घेवाण करतात १२० ज्याप्रमाणे जवळ जवळ असणारी सरोवरें उथाव आल्यावर परस्पर मिसळतात, आणि मगं तरंगांना तरंगांचीच घरे होतात; २१ त्याप्रमाणें अभेदभक्तीच्या भरांत परस्परांच्या गांठीभेटी पडून एकवटता झाली म्हणजे आनंदाच्या पुरांची एकत्र गुंफण होते आणि आत्मबोधाला आत्मबोधाचे अलंकार आत्मबोधाच्या द्वारेच मिळून शोभा वाढते. २२ जसे एका सूर्याला दुसऱ्या सूर्यानं ओवाळावे, किंवा एका चंद्राला दुसऱ्या चंद्रानं क्षेमालिंगन द्यावें, किंवा एकाच तोलाचे दोन १ जगुं मरु. २ बाहुली.