पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी यालागीं सुभद्रापति । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥ ४ ॥ म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥ ५ ॥ ऐसें जाणे जो साचें । तया 'चेयिरें जाहालें ज्ञानाचें । म्हणोनि उत्तमाधम भेदाचें । दुःस्वम न देखे ॥ ६ ॥ मी माझिया विभूति । विभूतीं अधिप्रिलिया व्यक्ति । हें आघवें योगप्रतीति । एकचि मानी ||७|| म्हणोनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥ ८ ॥ कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचे नाटीं । ती मज ॥ ९ ॥ म्हणऊनि अभेदें जो भक्तियोग | तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें पष्ठीं ॥ ११० ॥ तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । सांद झाली तरी परियेसा | बोलिजेल ॥। ११ ॥ अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते । इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८ ॥ सम० - मी उद्भव समस्तांचा मजपासूनि सर्वही । ऐसें जाणोनि भजती अभिज्ञ मज भक्तिनें ॥ ८ ॥ आर्या- उद्भव मी सर्वांचा प्रवर्ततें मजहिपासुनी सारें । हें जाणुनि मज भजती बुध ते होती न लिप्त संसारें ॥ ८ ॥ ओवी - मी सर्वांस उत्पत्तिस्थान । प्रवृत्ति सर्व मजपासून । ऐसें जाणोनि सर्व माझें करिती भजन । ज्ञानी भावयुक्त होवोनियां ॥ ८ ॥ तर मीच एक सर्वां । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ||१२|| कल्लोळमाळां अनेगां । जन्म जळींचि पैं गा । म्हणून, अर्जुना, हे भाव म्हणजे माझ्या मूर्तीच आहेत आणि यांनीं सर्व विश्व व्यापून सोडलें आहे. ४ या कारणास्तव ब्रह्मदेवापासून तो कीडमुंगीपर्यंत या सृष्टींत माझ्यावांचून दुसरी वस्तूच नाहीं. ५ हें ज्याला कळलें, त्याला जाणिवेचा जागेपणा येतो, आणि मग श्रेप्रकनिष्ठ, चांगलें वाईट, अशा प्रकारच्या भेदकल्पनांचे दुष्ट स्वप्न त्याला पडत नाहीं. ६ मी म्हणजे माझ्या विभूति, सर्व व्यक्ति या माझ्या विभूतींच्या अधीन, तेव्हां आत्मयोगानुभवाने हें सर्व एकच आत्मस्वरूप मानणें अवश्य आहे. ७ मग या आत्मयोगानें जो आपल्या मनोबळेंकरून माझ्याशीं समरस झाला, तो अत्यंत शुद्ध झाला; याविषयीं शंका घेण्याला तिळमात्रही जागा नाहीं. ८ आणि अर्जुना, जो कोणी अशा अभेद भावानें माझी भक्ति करतो, त्याच्या भजनाच्या चौकटीत मला शिरून राहावेंच लागते. ९ म्हणून हा जो अभेदात्मक भक्तियोग सांगितला, त्यांत कसलीही शंका नाहीं, आणि त्यांत दुर्बलतेचाही प्रसंग नाहीं. हा योग चालवीत असतां मृत्यु घडला तर चांगलेच हें मागें सहाव्या अध्यायांत स्पष्ट केलेच आहे. ११० आतां या अभेदाचें स्वरूप काय, हें जाणण्याचा ध्वनि तुझ्या मनांत उठत असेल, तर ऐक, तें स्वरूप आतां सांगतों. ११ या सर्व जगाचें मूळ मीच, आणि, अर्जुना, माझ्यापासून या सगळ्याची स्थितिगति चालते; १२ लाटांचे लोट पाण्यांत जन्माला येतात, आणि त्यांचा आश्रय आणि जीवितसाधन, हीं दोन्ही पाणीच १ जागृति, २ घरांत, चौकटीत. ३ प्रवेश, दाण, वास. ४ दुर्बळता. ५ शब्द, ध्वनि,