पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३१७ माझ्या मनीं जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा- | लागोनियां ॥९४॥ जैं लोकांची व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे । तैं महाभूतांचें दळवाडें । अंचुंबित असे ॥ ९५ ॥ तेंचि हे जाहाले । मग इहीं लोक केले | तेथ अध्यक्ष रचून ठेविले । इहीं जन ॥ ९६ ॥ म्हणोनि अकराही हे राजा । मग येर जग यांचिया प्रजा । एवं विश्वविस्तारु हा माझा । ऐसेंचि जाण ॥ ९७ ॥ पाहें पां आरंभीं वीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें । बूडीं कोंभ निघाले । खांदियांचे ॥ ९८ ॥ खांदियांपासूनि अनेका । फुटलिया नाना शाखा । शाखांस्तव देखा । पलव पानें ॥९९॥ पलवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जालें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि आघवें ॥ १०० ॥ तैसें मी एकचि पहिलें । मग मी तेंचि मनातें व्यालें । तेथ सप्त ऋषि जाले । आणि चारी मनु ॥ १ ॥ इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक खजिले | लोकांपासूनि निपजलें । प्रजाजात ॥ २ ॥ ऐसेनि हें विश्व येथें । मीचि विस्तारिलोंसें निरुतें । परि भवाचेनि हातें । माने जया ॥ ३॥ एतां विभूर्ति योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥ सम० - जो ही विभूति हा योग माझा जाणेल तश्वतां । तो मातें अचळें योगें योजे एथें न संशय ॥ ७ ॥ आर्या - माझे विभूतिलाही जाणे योगासि तत्वतां योगी । किमपिहि संदेह नसे अति दृढ योगासि होय संयोगी ॥ ७ ॥ ओवी - ऐसा मजपासुनी विस्तार । मज जो जाणे नर । तो दृढयोग पावे निर्धार । येथें नाहीं संशयो ॥ ७ ॥ 1 आहेत, ते माझ्या मनापासून उत्पन्न झाले, आणि त्यांच्या उत्पत्तीचा हेतु सृष्टीचा व्यापार हा होय. ९४ जोपर्यंत लोकांची रचना झाली नव्हती, जोपर्यंत हें त्रिभुवन विस्तारलें नव्हतें, तोंपर्यंत महाभूतांचा समूह निष्क्रियच होता. ९५ मग हे अकरा अस्तित्वांत आले, आणि यांनी लोक उत्पन्न केले व त्या लोकांत निरनिराळे आठ लोकपाल अधिपति नेमून ठेवले. ९६ अशा प्रकारें हे अकरा राजे होत आणि इतर सर्व जग यांची प्रजा आहे. एवंच हें सर्व विश्व म्हणजे माझाच विस्तार आहे, हें ध्यानीं घे. ९७ असें पहा, अगदीं आरंभाला एकच बी असते. मग तीच वाढली कीं मूळ फूटतें, त्या मूळावर मग अंकुर येतात आणि त्यांच्या फांद्या बनतात. ९८ या फांद्यांना दुसऱ्या फांद्या फुटतात, आणि सर्व फांद्यांवर पानें पसरतात. ९९ पानांवर फुलें, फळें, येतात. अशा प्रकारे वृक्षपण पूर्णतेला येतें. पण या वृक्षत्वाचा नीट विचार केला, तर तो सर्व मूळच्या लहानशा बीजाचाच विस्तार ठरतो. १०० याच न्यायानें, 'मी' हें मूळचें एकच तत्त्व; हें 'मीच ' मनाला उत्पन्न करतें झालें, आणि या मनापासून सात ऋषि व चार मनु निपजले; १ आणि या अकरांनी लोकपाळ अस्तित्वांत आणले, आणि लोकपाळांनीं नानाप्रकारचे जन उत्पन्न केले; आणि या जनांपासून अखिल प्रजा जन्मली. २ याप्रमाणें हें सर्व जग मींच विस्तारलें आहे; पण हे समजणार कोणाला, तर ज्याला या भावांच्या व्युत्पत्तीविषयीं श्रद्धा वाटेल त्यालाच. ३ १ समूह, २ निष्क्रिय, कार्यहीन, ३ अधिपति, अष्ट लोकपाळ. ४ माझ्या भावांच्या व्युत्पत्तीच्या द्वारें,