पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी निरवधि । असंमोह सहनसिद्धि । क्षमा सत्य ॥ ८३ ॥ मग शम दम दोन्ही । सुखदुःख वर्ते जें जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावांचिमाजीं ॥ ८४॥ पैं भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुष्टि तप पांडुसुता । दान जें गा ॥ ८५ ॥ अगा यश अपकीर्ति । हे जे भाव सर्वत्र दिसती । ते मजचिपासून होती । सूतांचिया ठायीं ॥ ८६ ॥ जैसीं भूतें आहाती सिनांनीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं । एक उपजती माझ्या ज्ञानीं । एक नेणती मातें ॥ ८७ ॥ प्रकाश आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तूसीं ॥ ८८ ॥ आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया देवाचें करणें । म्हणोनि भूतीं भावाचें होगें । विपम पडे ॥ ८९ ॥ यापरी माझिया भावीं । हे जीवसृष्टि आघवी । गुंतली असे जाणावी । पांडुकुमरा ॥ ९० ॥ आतां इये सृष्टीचे पालक | जयां अधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥ ९१ ॥ महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥ सम० - सप्तऋषी मनू चौघे सनकादिक मानस । पूर्वी मद्भक्त हे झाले लोकीं या ज्यांचिया प्रजा ॥ ६ ॥ आर्या- सप्तर्षि चार पूर्वज मनु हे मानस समग्र मद्भाव । झाले लोक त्यांच्या प्रजाहि ज्यांचा महानहि भाव ॥ ६ ॥ ओंवी — ऋषी आणि चारी मनू । हे सर्व मजपासून । सृष्टि झाली त्यांपासून । म्हणोनि हे लोक माझी प्रजा ॥ ६ ॥ तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महपमाजी प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध | सप्तऋषी ।। ९२ ।। आणिकही सांगिजतील । जे कां चौदाआंतुल मुदल | स्वयंभू मुख्य वडिल | चारी मनु ॥ ९३ ॥ ऐसे हे अकरा | अभाव, सहनशीलता, क्षमा, आणि सत्य. ८३ यानंतर मनोनिग्रह व इंद्रियनियंत्रण, हे दोन. तसेंच, अर्जुना, जगांतलें सुखदुःख आणि जन्ममरण, हींही माझेच भावांत येतात. ८४ अरे, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समता, संतोष आणि तप, दान, यश, आणि अपयश, हे जे भाव या भूतमात्रांच्या ठिकाणी आढळतात, तेही माझ्यापासूनच झाले आहेत. ८५, ८६ जशीं भूतें वेगवेगळी आहेत, तसे हे भावही निरनिराळे आहेत; मात्र कांहींना माझें ज्ञान होतें, आणि कांहींना तें होत नाहीं. ८७ प्रकाश आणि अंधार, हे दोन्ही सूर्यामुळे होतात, कारण त्याच्या उदयाने प्रकाश दिसतो, तर त्याचा अस्त झाला म्हणजे काळोख भासमान होतो. ८८ तसेंच मला जाणणें किंवा नेणें हें त्या त्या भूतांच्या देवाचें म्हणजे कर्माचं फळ आहे; यामुळें भूतमात्राला ह्या माझ्या भावांचे अस्तित्व संकटप्राय होतें. ८९ याप्रमाणे, अर्जुना, ही सर्व भूतसृष्टि माझ्या भावांत गुरफटून गेली आहे. ९० आतां या सृष्टीला पाळणाऱ्या ज्या भावांच्या अंकित सर्व लोक राहातात, अकरा भाव आणखी आहेत; ते ऐक. ९१ सर्व महपमध्ये गुणांनीं व ज्ञानानें श्रेष्ठ असलेले जे कश्यपादि सप्तर्षि आहेत, आणि चौदा मनूंमध्यें जे स्वायंभूप्रभृति चार मुख्य मनु आहेत, ९२, ९३ अर्जुना, असे हे जे अकरा १ जन्ममरण २ वेगवेगळी, ते