पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३१३ क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे । तंव तंव नुवगिजे । वोहो करितां ॥५५॥ पुढतपुढती पुढे देतां । जोडे वानियेची अधिकता । म्हणोनि सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे || ५६ || तैसें एथ पार्था । तुज औभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । वोलों पुढती ॥ ५७ ॥ जैसें वाळका लेवविजे लेणें । तें शृंगारातें काई जाणे । परि ते सुखाचे सोहळे भोगणें । माउलिये दिठी ॥ ५८ ॥ तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे | ऐसें आहे ॥ ५९ ॥ आतां अर्जुना असो हे विकेंडी। मज उघड तुझी आवडी । म्हणोनि तृप्तीची सवंडी। बोलतां न पडे ॥६०॥ आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें । परि असो हैं अंतःकरणें । अवधान देईं || ६ || तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें परम | जें अक्षरें लेऊनि परब्रह्म । तुज वाँसि आलें || ६२|| परी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरि तो गा जो मी एथें । तें विश्वचि हें ॥ ६३ ॥ न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिहिं देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २ ॥ सम० - महर्षी देवही माझ्या प्रादुर्भावास नेणती । कीं मी महर्षिदेवांचा सर्वांचा आदिकारण ॥ २ ॥ आर्या - सुरगण आणि महर्षी नेणति माझा कुणीच संभवतों । आदी चराचरा मी मजपासुनि होय सर्व संभव तो ॥२॥ ओंषी - माझी उत्पत्ति नेणती सुरवर । आणि ऋषिही समग्र । हे नेणती याचे उत्तर यांची उत्पत्ति मजपासुनी ॥ २ ॥ 1 अरे, प्रतिवर्षी शेताची पेरणी करीत असतां, जसजसे पीक वाढत चालल्याचं दिसून येतें तसतसा शेतीचेक करतांना कंटाळा येईनासा होतो. ५५ पुन्हां पुन्हां ताव देऊन उजळा दिला म्हणजे सोन्याची कांति अधिकाधिक चढते, म्हणून, अर्जुना, सोन्याचें अधिकाधिक शोधन करावेंसें घाटू लागतें. ५६ त्याप्रमाणेच, हा कांहीं आम्ही तुझ्यावर उपकार करीत नाहीं, तर आम्ही आपल्या आवडीनें स्वसंतोषार्थ हें पुन्हां पुन्हां बोलत आहों. ५७ लहान मुलाच्या अगावर दागिने घालतात, पण त्या मुलाला त्यांची काय जाणीव असते ! परंतु त्या दागिन्यांच्या सुखाचा सोहळा जसा . आईच्या डोळ्यांनी उपभोगावयाचा असतो, ५८ त्याप्रमाणें तुला जसजसा आत्महिताचा लाभ घडतो, तसतसे आमचें सुख दुप्पट वाढतें, असें प्रस्तुत झाले आहे. ५९ परंतु, अर्जुना, आतां ही अलंकारिक भाषा पुरे. उघड उघड मी तुझ्या स्नेहाला भुललों आहें, म्हणून कांहीं केलें तरी माझ्या प्रेमळ मनाची तृप्तीच होत नाहीं. ६० इतक्याच कारणास्तव आम्ही तेंच तें पुन्हां पुन्हां तुझ्याशीं बोलतो. पण आतां ही प्रस्तावना पुरे. एकाग्र चित्तानें आतां श्रवण कर. ६१ म्हणून, अर्जुना, माझें रहस्यतत्त्व ऐक. अरे, माझें हें अगाध वचन म्हणजे अक्षरांचे रूप घेऊन प्रत्यक्ष परब्रह्मच तुला गळामिठी घालण्याकरितां आपण होऊन आलें आहे ! ६२ पण, अर्जुना, माझें खरें निश्चित ज्ञान तुला अजून झालें नाहीं. अरे, जो मी तुला येथें दिसतों, तोच मी म्हणजे हे विश्वच होय. ६३ १ मेहनत, कष्ट. २ ताव देऊन उजळले असतो. ३ उपकार. ४ अलंकारिक भाषा, विनोदवचन. ५ पूर्णता, पूर्तता. ६ रहस्य- तत्त्व. ७ गळामिठीसाठी. ४०