पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥ ४७ ॥ जो चराचरपरमगुरु । चतुरचित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु | वोलता जाहला ॥ ४८ ॥ ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि ॥ ४९ ॥ श्रीभगवानुवाच — भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥ सम० - पुन्हा आईक हा माझा बोल उत्तम जो तुझ्या हितार्थ बोलतों कीं तूं श्रवण प्रीति पावसी ॥ १ ॥ आर्या - पुनरपिहि महाबाहो कथितों मी परमवचन या परिस। तुज मी हितगुज वदतों तूं परम प्रिय मलाहि बापरिस १ ओवी — कृष्ण म्हणे हे अर्जुन । ऐक माझें परम वचन । तूं सखा म्हणून । हितोपदेशितों तुझिया हितालागीं ॥ १ ॥ . आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिले । परि टांचें नव्हे भलें । पुरतें आहे ॥ ५० ॥ घटीं थोडेंसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । ऐसा परिसौनि पाहिलास तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥ पहिलें अवचितयावरी सर्वस्व सांडिजे | मग चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा किरीटी तूं आतां माझें । निजधाम कीं ॥ ५२ ॥ ऐसें अर्जुना येतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें । गिरि देखोनि सुभरे । मेघु जैसा ॥ ५३ ॥ तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाची अभिप्रावो । सांगेन पुढती ॥ ५४ ॥ पें प्रतिवर्षी देशभाषेचं सर्व सौंदर्य व आवेश हीं लुटून आणून, हें गहन गीतातत्त्व प्रतिपादिले आहे. ४७ आतां सर्व चराचराचे श्रेठ गुरु व चतुर जनांच्या चित्ताला संतोषविणारे, ते यादवनाथ श्रीकृष्ण काय बोलते झाले, तें ऐका. ४८ श्रीनिवृत्तिनाथाचा दास ज्ञानदेव म्हणतो, कीं, श्रीकृष्ण सांगतात, “अर्जुना, तूं आत्मज्ञानाचे संपूर्ण प्रतिपादन ऐकण्यास अंतःकरणानें खरोखरच योग्य झाला आहेस. ४९ आम्ही तुला मागें जें सांगितलें, तें, तुझें लक्ष कितपत आहे, हें पाहाण्याकरितांच होते. या परीक्षेत असें ठरलें आहे, कीं, तुझें लक्ष अपुरें नाहीं, तर भरपूर आहे. ५० भांड्यांत थोडेसे पाणी घालावें आणि तें गटतें कीं काय पहावें; गळलें नाहीं तरच आणखी पाणी ओतून तें तोंडापर्यंत भरावें. याच न्यायाने थोडेसे श्रवण तुला घडवून, आतां असा निर्णय झाला आहे, कीं, तुला संपूर्ण श्रवण घडविणें योग्य आहे. ५१ नवा चाकर ठेवला म्हणजे पहिल्या प्रथम त्याला अवचित सांपडेल अशा रीतीनें कांहीं मालवान वस्तु त्याची परीक्षा पाहाण्याकरितां टाकावी, आणि तिच्या अभिलापाला बळी न पडतां त्यानें आपला विश्वासूपणा पूर्ण प्रत्ययास आणून दिला, म्हणजे त्या चाकराला जामदारखान्यावर नेमावें, त्याप्रमाणंच, अर्जुना, तूं पूर्ण कसोटीस उतरल्यामुळे आतां तूं माझे सर्वस्व झाला आहेस." ५२ अशा प्रकारं सर्वाचे स्वामी श्रीकृष्ण एवढे अर्जुनाला बोलले, मग ज्याप्रमाणें उंच पर्वताच्या दर्शनानें मेघ दाटून जाऊन ओथंबतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रेमानें दाटून गेले व म्हणाले, "हे वीरवरा अर्जुना, ऐक, पूर्वी सांगितलेलेच तत्त्व मी पुन्हां कथन करतों. ५३।५४ १ घड, समर्थ, योग्य.