पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ફરષ્ટ सार्थ श्रीज्ञानेश्वरी एथ वेद मुके जाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशि जेथ ॥ ६४ ॥ अगा उदरींचा गर्भ जैसा । न देखे आपुलिये मातेची वयसा । मी आघवेया देवां तैसा । नेणवे कहीं ॥ ६५ ॥ आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवेचि गगन । तेविं महपींचें ज्ञान । न देखेचि मातें ॥६६॥ मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला । या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥ ६७ ॥ कां जे महप आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणोनि पांडवा | अवघड जाणतां ॥ ६८ ॥ उतरलें उदक पर्वत वळ । जरी झाड वाढत मुळीं लागे । तरी मियां झालेनि जगें । जाणिजे मातें ॥६९॥ कां गोभेवणें वटु गिंवसवे । जरी तरंगी सागरू सांठवे । कां परमाणू माजी सामावे । भूगोलु हा ॥७०॥ तरी मियां जालिया जीवां । महर्षी अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥ ७१ ॥ यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥ सम० - जाणे अज अनादिवें मुख्या सर्वेश्वरा मला । सुज्ञ तोचि मनुष्यांत बंधापासूनि सूटतो ॥ ३ ॥ आर्या-जो मी लोकमहेश्वर अनादि जो मी असें मज समजला । तो निष्पापशिरोमणि तोचि असंमूढ जाणता मजला ॥ ३ ॥ ओवा - अज अनादिखें मातें । जाणे मज सर्वेश्वरातें । तोचि सुज्ञ मनुष्यांत । बंधापासूनियां सुटे ॥ ३ ॥ ऐसाही जरी विपायें | सांडूनि पुढील पाये । सवेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ॥ प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागिलीकडे । महाभूतांचिया चढे । माथ्यावरी ॥ ७३ ॥ तेथ राहोनि ठायटिके | अरे, माझ्या स्वरूपाचें प्रतिपादन करतांना, वेदांनीं मौन स्वीकारलें; मनाची व वाऱ्याचीही गति तेथे चालेना; रात्र न होतांच भर दिवसा सूर्यचंद्र निस्तेज झाले. ६४ अरे, मातेच्या उदरांत असणारा गर्भ जसें मातेचें तारुण्य पाहू शकत नाहीं, तद्वत् कोणाही देवाला माझें ज्ञान कधीही होऊं शकत नाहीं. ६५ आणि माशांना जशी अफाट सागराची मोजणी करतां येत नाहीं, किंवा माशीला जसा गगनमंडळाचा विस्तार ओलांडतां येत नाहीं, तसेंच या महपींचे ज्ञानही माझें स्वरूप पाहूं शकत नाहीं. ६६ मी कोण, केवढा, कोणापासून झालों, या प्रश्नांचा निर्णय करतां करतां कल्पावधि काळ गेला. ६७ याचे कारण असें कीं, हे देव, महर्षि, व इतर सर्व भूतमात्र, या समस्तांचं मूळकारण मीच असल्यामुळे, अर्जुना, माझें ज्ञान त्यांना फार कठीण आहे. ६८ उतरणीला लागलेले पाणी जर उलट पर्वतावर चढेल, वाढतें झाड जर मूळालाच भिडेल, तरच माझ्यापासून उत्पन्न झालेलं हें जग मला जाणूं शकेल ! ६९ किंवा जर गाभ्यांतून बाहेर येणाऱ्या पानाने वटवृक्ष झांकला जाईल, किंवा पाण्याच्या तरंगांत संबंध समुद्र सांठवला जाईल, किंवा मातीच्या सुक्ष्म रेणूंत हा पृथ्वीचा गोल समावला जाईल, ७० तरच माझ्यापासूनच उपजलेल्या या भूतमात्राला, महीना, अथवा देवांना, मला जाणण्याचे साधेल ! ७१ असें असूनही, जो कोणी सहज, लौकिक प्रवृत्तीची पुढील चाल सोडून, इंद्रियांपासून पराङ्मुख होतो, ७२ आणि प्रवृत्तीची चाल चालू असली तरी जो कोणी मागें मुरडून व देहभाव विसरून, पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढून जाती, ७३ आणि त्या ठिकाणी ठाम टिकून, १ गाम्यांतून बाहेर येणाऱ्या पानाच्या कुइरीनें.