पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३११ भरिलें | तैसें मज मुक्याकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥ परि हैं असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैसे। राम रावण जैसे । मीनले समरी ॥ ३८ ॥ तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमींचियाचिऐसें मी म्हणें । या निवाडा तत्त्वन्नु जाणे । जया गीतार्थ हातीं ॥ ३९ ॥ एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले । आतां उत्तरखंड उवाइलें | ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥ जेथ विभूति प्रतिविभूति । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ति । म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥ देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणे । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासी ॥ ४२ ॥ मूळग्रंथींचिया संस्कृता । वरि मन्हाटी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हैं न चोजवे ॥ ४३ ॥ जैसें अंगाचेनि सुंदरपणें | लेणिया आंगचि होय लेणें । तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ||४४|| तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनी । शोभती आयणी | चोखट आइका ।। ४५ ।। उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वैडप। चातुर्य म्हणे पेंडप । जोडलें आम्हां ॥। ४६ ।। तैसें देशियेचें लावण्य । मुक्याच्या तोंडून वाचेला अगम्य असें अध्यात्मविवरण आज घडविलें आहे. ३६, ३७ परंतु या आपल्या अद्भुत करणीला उपमा शोधणें केवळ अशक्य आहे. रामरावणांचें युद्ध कसें झालें ? तर रामरावणांच्याच युद्धासारखे झाले, इतकेंच केवळ म्हणतां येतें, ३८ तद्वतच नवव्या अध्यायांतील श्रीकृष्णांचें भाषण या नवव्या अध्यायांतील भाषणासारखेच आहे, याला अन्य उपमा शोधूनही मिळत नाहीं, असें मी म्हणतों, आणि, ज्यांनी गीतेचा अर्थ अगदी आपलासा केला आहे, त्या तत्त्वज्ञांना हा निर्णय पूर्णपणें अवगत आहे. ३९ याप्रमाणं मी आपल्या बुद्धीनुसार गीतेचे पहिले नऊ अध्याय विवेचन करून सांगितले आहेत, आतां गीतेच्या उत्तरखंडाचें स्वस्थपणे श्रवण करावं. ४० या खंडांत आरंभींच श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या प्रधान व गौण विभूति सांगतील, ती सुंदर रसाळ कथा कथन करण्यांत येईल. ४१ ही मराठी देशभाषा खरी, पण तिच्या सौंदर्याच्या आधारानें शांतरस शृंगाररसावरही वरकडी करील आणि या मराठी ओव्या तर सुंदर वाङ्मयाला केवळ साजाप्रमाणेच साजतील. ४२ मूळ संस्कृत संहितेवरील मराठी ओव्या वाचून अर्थाचें नीट ग्रहण झालें असतां, यांत मूळ कोणतें व टीका कोणती याबद्दलही श्रोत्यांना भ्रांति पडून ते चकित हातील. ४३ ज्याप्रमाणें अंगाच्या जातिवंत लावण्याने आंगच दागिन्याला शोभादायक दागिना होतें, आणि मग दागिन्यानें अंगाला कीं अंगानें दागिन्याला शोभा आणली, हें स्पष्ट सांगतां येत नाहीं, ४४ तद्वत् देशी भाषा आणि संस्कृत भाषा प्रकृत विषयांत अर्थाच्या एकाच आसनावर अधिष्ठित झालेल्या कशा सारख्या शोभतात, हें शुद्ध सरळ मतीनें पहा. ४५ कोणताही भाव आकारास आला असतां, रसाळपणाची झड सुरू होते, आणि चातुर्यालाही विशेष खुलावट चढते. ४६ त्याप्रमाणेंच या १ झड वर्षाव २ प्रतिष्ठा, गौरव.