पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१० सार्थ श्रीज्ञानेश्वरी तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमी । करूनि भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चाही ॥ २८ ॥ पाठी समप्रश्नविधि | बोलोनि प्रयाणसमयबुद्धि । एवं सकळ वाक्यावधि । अष्टाध्यायीं ॥ २९ ॥ मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षं जोडे ॥३०॥ तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातें शतीं । तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥ म्हणोनि नवमचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । विहाला मी काह वायां । गर्व करूं ॥ ३२ || अहो गुळा साखरे मालेयाचे । हे वांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आन आन जैसे ॥ ३३ ॥ एक जाणोनियां बोलती । एक ठायें ठावी जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशी ॥ ३४ ॥ तैसे अध्याय हे गीतेचे। परि अनिर्वाच्यपण नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभु || ३५ ॥ अहो एकाची शादी तपिन्नी । एक सृष्टीवरी सृष्टि केली । एकीं पापाणी पाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें || ३६ || एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं चुळींचि सागरातें आहे. २७ यानंतर सातव्या अध्यायांत मायेचें उच्चाटन प्रथम करून जे चार प्रकारचे भक्त ईश्वराची उपासना करतात, त्यांचं वर्णन आलं आहे. २८ यापुढे आठव्या अध्यायांत सात प्रश्नांचें व्याख्यान करून, अध्यायाच्या अंतापर्यंत, मरणकालीं कशी बुद्धि असते, याचा विचार केला आहे. २९ अपार शब्दब्रह्म जे वेद, त्यांत जें कांहीं तत्त्वज्ञान हातीं लागतें, तें सर्व एकलक्ष भारत ग्रंथांत लाभतं; ३० आणि सर्व भारतांत जे ज्ञान भरलें आहे, तें सर्व कृष्णार्जुनसंवादांत सांपडतें; आणि कृष्णार्जुनसंवादाच्या सातशे श्लोकांत जं सार आहे, त्याचा सर्वच एकत्र केलेला सांठा गीतेच्या एकट्या नवव्या अध्यायांत आहे. ३१ मग त्या नवव्या अध्यायाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्याला जो मी मनांत अगदीं घाबरून गेलों होतों, तो मी उगाच गर्व कशाला वाहीन ? ३२ अहो, गूळ आणि साखर यांच्या ढेपी एकाच उसाच्या रसाच्या बांधलेल्या असतात, परंतु त्यांच्या गोडीची खुमारी वेगवेगळी असते. ३३ त्याप्रमाणेच हे सर्वत्र अध्याय जरी गीतेचे आहेत तरी कांहीं अध्याय समजुतीनें ब्रह्मतत्त्वाचे स्पष्ट विवेचन करतात, कांहीं जेथल्या तेथें नुसतें सुचवितात, आणि कांहीं आपल्या जाणतेपणाच्या गुणासह विरून गेल्यासारखे भासतात. ३४ हे असे गीतेचे अध्याय आहेत, परंतु नवव्या अध्यायाचें माहात्म्य शब्दांनी सांगतांच येत नाहीं. त्याचें प्रतिपादन मी करूं शकलों, हें केवळ तुझं गुरुरायाचेंच सामर्थ्य होय. ३५ अहो, कोणा एकांची ( उदा० वसांची ) छाटी सूर्यासारखी तळपूं लागली, कोणा एकांनी (उदा० विश्वामित्रांनी ) प्रतिसृष्टि निर्माण केली, कोणा एकांनी (उदा० रामचंद्रांनीं ) पापाणांचा सेतु करून आपली सेना पायानें समुद्रपार नेली, कोणा एकांनी ( उदा० मारुतींनीं ) सूर्याला हातांनीं कवळिलें, कोणापकांनी ( उदा० अगस्तींनी ) एका चुटांतच सागराला आटवलें, त्याप्रमाणेंच तुम्हींही माझ्यासारख्या १ विवरण्याला, स्पष्ट करून सांगण्याला. २ देपांचे.