पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा ३०९ ठेविली जैसी ॥१७॥ ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें। बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥ १८ ॥ तैसी जे ब्रह्मविद्यां रावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोविये गावों । ऐसें केलें ॥ १९ ॥ जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥ २० ॥ होती देहबुद्धि एकसरी । ते आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ||२१|| ऐसें एकेक देवाचें करणें । तें अपार वोलों केविं मी जाणें । तही अनुवादलों धीटपणें । तें उपसाहिजो जी ॥ २२ ॥ आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्गीता ववप्रबंधे। पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें || २३ || प्रथम अर्जुनाचा विषादु । दुजी वोलिला योग विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ||२४|| तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थी ज्ञानेंशी प्रगटिलें । पंचमी व्हरिलें | योगतत्त्व ॥ २५ ॥ तेंचि पष्ठामाजी प्रगट | आसना लागोनि स्पष्ट | जीवात्मभाव एकवट । होती जेणें || २६ || तैसी जे योगस्थिति । आणि योगभ्रष्टां जे गति । ते आघवीच उपपत्ति | सांगितली पष्ठीं ॥ २७॥ दूध मागितलें असतां, त्या दैवतानें प्रत्यक्ष क्षीरसमुद्रच त्याच्यापुढें दुधाच्या वाटीसारखा ठेवला, १७ किंवा रुसलेल्या ध्रुवाची मोठ्या लाडानें समजूत घालण्याकरितां वैकुंठाधिपति नारायणानें त्याला ध्रुवपदाचा खाऊ दिला, १८ त्याचप्रमाणे आपण कृपाप्रसाद करून, जी सर्व अध्यात्मविद्यांत श्रेष्ठ आहे, व जिच्यामध्यें सर्व शास्त्रांचा मेळ बसून तीं सुखाने एकत्र नांदतात, त्या भगवद्गीतेची ओवीबद्ध टीका रचण्यास मला समर्थ केलें आहे. १९ ज्या वाणीच्या जंगलांत वणवण करीत फिरलें असतां सार्थ अक्षराच्या फळाचें नांवही ऐकूं येत नाहीं, अशी माझी ही रूक्ष वाणी आपणच विवेकाची कल्पलताच आज केली आहे. २० जी माझी बुद्धि एकसारखी देहभावमय झाली होती, ती तुम्ही सांप्रत ब्रह्मानंदाच्या भांडाराची खोलीच बनविली आहे. माझें मन गीतार्थरूपी समुद्रांत खुशाल जलशयन करीत आहे. २१ श्रीगुरुदेवाची एकेक करणी अशी अलौकिक आहे. मग त्या निःसीम करणीचें वर्णन मला कसे करतां येईल ? तरी पण कांहीं वर्णन करण्याचें धाडस मी येथे केलें आहे, त्याची गुरुमहाराजांनी मला क्षमा करावी. २२ आतां आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद्गीतेच्या पहिल्या खंडाची ओवीबद्ध टीका मोठ्या हौसेने केली. २३ पहिल्या अध्यायांत अर्जुनाला आत्मस्वकीयांच्या नाशाच्या कल्पनेनें झालेला खेद वर्णिला आहे. दुसऱ्या अध्यायांत कर्मयोग स्पष्ट केला आहे, पण तो व सांख्यांचा ज्ञानयोग यांमधील भेदही दाखविला आहे. २४ तिसऱ्यांत कर्माचा पुरस्कार आहे. आणि चवथ्यांत त्याच कर्माचें ज्ञानासह प्रतिपादन केलें आहे. पांचव्यांत योगतत्त्वाचा गौरव केला आहे. २५ सहाव्यांत तेंच योगतत्त्व अधिक स्पष्ट केलें आहे. आरंभीच्या आसनापासून तो शेवटच्या ब्रह्मैक्यस्थितीपर्यंत सर्व प्रांजळपणें कथन केलें आहे. २६ त्याप्रमाणंच योगस्थिति म्हणजे काय आणि योगभ्रष्टांना कोणती गति लाभते, याचा विचार सहाव्यांत १ गौरविलें,