पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगीकारी । तो वाचस्पतीशी करी । प्रबंधु ॥ ८ ॥ हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पांरुखे । तो जीवचि परि तुके । महेशेंशीं ॥ ९ ॥ एवढें जिये महिमेचें करणें । ते वाचावळें वानूं मी कवणें । कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥ १० ॥ केउता कल्पतरूवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा | कवणें वास कापुरा । सुवास देवों ॥। ११ ॥ चंदना काइसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगना वरी उभवावें । घडे केवीं ॥ १२ ॥ तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें के असे साधन । हें जाणोनि मियां नमन | निवांत केलें || १३ || जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसामर्थ्या रूप करूं म्हणे । तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल ॥ १४ ॥ कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतीचीं बोलणीं । उगियांचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ||१५|| मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्ही । म्हणोनि कृष्णार्जुनसंगमी । प्रयागवड जाहलों ॥ १६ ॥ मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यू पुढें धूर्जटी । थांग लागतो. ७ महाराज, आपल्या प्रेमळ वाणीनें जरी मुक्याला गोंजारलें, तरी तोही प्रत्यक्ष बृहस्पतीशीही ग्रंथ रचण्याच्या कामी प्रतिज्ञेनें स्पर्धा करूं शकतो ! ८ इतकेंच नव्हे, तर आपल्या दृष्टीचा प्रकाश ज्याच्यावर पडतो, किंवा आपला कोमल हात ज्या मस्तकावर ठेवला जातो, तो जीव असला तरीही शिवाच्या बरोबरीला चढतो. ९ ज्या करणीचें एवढें माहात्म्य आहे, तिचं मी आपल्या मर्यादित वाणीच्या बळानें कसें वर्णन करूं शकेन ? अहो, सूर्याच्या अंगाला कधींतरी उटणें लावतां येईल काय ? १० कल्पवृक्षावर फुलांचा शृंगार कितीसा चढवतां येईल ? क्षीरसागराला कोणत्या पक्वान्नांचा पाहुणचार करावा ? कापराला दुसऱ्या कोणत्या वासानें सुवासिक करावें बरें ? ११ चंदनाला कोणती उटी लावावी ? अमृताला कोणतें अन्न पकवावें ! आकाशाला आणखी उंच चढवावयाला कांहींतरी युक्ति सांपडेल काय ? १२ त्याप्रमाणेंच श्रीगुरूचें माहात्म्य पूर्णपणे आकलन करण्याला साधनच कोठें आहे ? हे जाणूनच मी त्या गुरुरायाला वाचाळपण न करतां मुकाट्यानेच नमन केलें आहे. १३ जर आपल्या बुद्धिसामर्थ्याच्या घमेंडींत कोणी ' श्रीगुरुसामर्थ्याचं मी संपूर्ण यथास्थित वर्णन करतों, ' असें म्हणेल, तर तें त्याचें म्हणणें, पाणीदार मोत्याला करणीची झिलई देण्यासारखेच हास्यास्पद होईल. १४ किंवा चोख सोन्यावर चांदीचा मुलामा देण्यासारखींच त्यानें केलेलीं गुरूचीं स्तोत्रे ठरतील. म्हणून, कांहींच न बोलतां गुपचूप गुरूच्या पायावर मस्तक लववणें हेंच चांगलें. १५ मग मी श्रीगुरुनाथांस म्हटलें, 'अहो, स्वामी, तुम्ही ममतेनें माझ्याकडे पाहिल्यामुळे, जसा गंगायमुनांच्या संगमांत प्रयागवट, तसा मी या कृष्णार्जुनसंवादाच्या संगमांत झालों आहें. १६ ज्याप्रमाणें पुरातन काळीं उपमन्यूनें शंकराजवळ १ ग्रंथरचनेची पेज. २ राहतो,