पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय दहावा ॐ नमो विशदवोधविदग्धा । विद्यारविंदप्रवोधा । परापरमप्रमदा - । विलासिया ॥१॥ नमो संसारतमसूर्या । अपरिमिता परमवीर्या । तरुणतमतुर्या । ललनलीला ॥ २ ॥ नमो जगदखिलपालना | मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥ नमो चतुरचित्तचकोर चंद्रा | आत्मानुभव नरेंद्रा । श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥ नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना | विश्वोद्भवभुवना | श्रीगुरुराया ॥ ५ ॥ तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरेसु । तैं सारस्वतीं प्रवेशु | वाळकाही आथी ॥ ६ ॥ जी दैविकी उदारा वाचा । जें उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥ ७ ॥ जी आपुलिया हे गुरुराया, तूं ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट बोध करण्यास समर्थ आहेस. विद्यारूपी कमलाचा विकास तूंच पराप्रकृति हीच कोणी श्रेष्ठ तरुणी, तिच्याशीं तूं सुखक्रीडा करतोस. अशा तुला मी नमन करतों. १ संसाररूपी अंधकाराला नष्ट करणारा सूर्य तूं आहेस. तुझें स्वरूप अमर्याद आहे. तुझें सामर्थ्य अफाट आहे. नुकतीच तारुण्यांत येणारी जी तुर्यावस्था म्हणजे आत्मसमाधि तिचें लालनपालन सहज रीतीनें करणारा तूंच अशा तुला मी नमन करतो. २ सर्व जगाचें पालन करणाऱ्या, तूं शुभ कल्याणरूपी रत्नांचा संग्रह आहेस. सज्जनरूपी वनाला सुगंधित करणारा तूंच चंदन आहेस. आराधनेस योग्य असें दैवत तूंच आहेस. अशा तुला मी नमन करतों. ३ चकोराला जसा चंद्र तसा तूं चतुर जनांच्या चित्तास संतुष्ट व शांत करतोस तूं आत्मसाक्षात्काराचा सर्वाधिकारी आहेस; वेदाच्या ज्ञानरसाचा तूं केवळ सागर आहेस; आणि सर्व जगाचें मंथन करणारा जो कामविकार, त्याचें मंथन करणारा तूं आहेस; गुरुराया, अशा तुला मी नमन करतों. ४ तूं सद्भक्तांनी भजण्यास पात्र आहेस; संसाररूपी हत्तीचें गंडस्थळ फोडणारा तूंच; जगदुत्पत्तीचें आदिस्थानही तूंच आहेस; अशा तुला गुरुरायाला मी नमन करतों. ५ महाराज, तुमचा प्रसाद हाच विद्यापति गणेश, त्याची कृपा जेव्हां लाभते, तेव्हां मूढ बाळकालाही वाङ्मयप्रांतांत प्रवेश करतां येतो. ६ अहो, जेव्हां गुरूची वाणी अभयवचन देते, तेव्हांच शृंगारादि नवरसांच्या गोड समुद्राचा १ कृपा. २ वाङ्मयति. ३ गुरूची,