पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मोतियांचीं कैडियाळीं । आवैडे तैसा ॥ २९ ॥ ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हों पाहे जीवदशे । तेथ निरोपिलें व्यासें । तें नेदीचि हों ॥५३०॥ आणिक श्रीकृष्णाचें बोलणें । घोकरीं आलें श्रवणें । कीं देहस्मृतीचा तेणें । वापैंसा केला ॥ ३१ ॥ तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी | सर्वांगांचा स्वेदु परिमार्जी । तेवींचि अवधारा म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ३२ ॥ आतां श्रीकृष्णवाक्यवीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा विवैडु | म्हणोनि श्रोतयां होईल सुरवाड | प्रमेयँपिकाचा ॥ ३३ ॥ अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवरी वैसावें । वाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ३४ ॥ म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥ मोत्यांच्या जाळ्याच आपल्या अंगावर घातल्या होत्या ! २९ अशा प्रकारें महासुखाच्या अपरंपार रसांत जीवाचें भान विरून गेल्यामुळे, रणवृत्तांत सांगण्याची जी कामगिरी श्रीव्यासांनीं त्याच्यावर सोंपवली होती, ती त्याच्या हातून होईनाशी झाली. ५३० इतक्यांत श्रीकृष्णाच्या वाणीचा आवाज घोंघों करीत त्याच्या कानांत घुसला, आणि त्याने संजयाला पुन्हां भानावर आणिलें, व रणवृत्तांत सांगण्यास सिद्ध केलें. ३१ नंतर त्याने डोळ्यांतले अश्रु पुसले, सर्व अंगावरचा घामही पुसला, आणि तो म्हणाला, "धृतराष्ट्र महाराज, आतां पुढील वृत्तांत सांगतों, तिकडे लक्ष द्यावें. " ३२ आतां श्रीकृष्णांच्या वचनाचें वेंचक बीं, आणि संजयाची सत्ववृत्ति ही त्या बियाच्या दुसन्या पेरणीकरितां तयार केलेली जमीन, असा सुंदर योग आला असतां, श्रोत्यांना सिद्धांतरूपी पिकाची सुगीच होईल यांत शंका नाहीं. ३३ श्रोते हो, या कथनाकडे थोडेंसें लक्ष द्यावें, आणि खुशाल आनंदाच्या पुंजावर बसावें. अहो, आपल्या श्रवणेंद्रियाचें आज दैवच उघडलें आहे ! ३४ तेव्हां, आतां सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला ईश्वरी विभूतींचें स्थान निरूपण करतील, तें आपण श्रवण करा, अशी या श्रीनिवृत्तिदास ज्ञानदेवाची विनंति आहे. ५३५ १ जाळ्या. २ वाटे, भासे. ३ राब भाजून बी पेरण्यास तयार केलला भूभाग, वाफा ४ वेचकपणा, ५ दुसऱ्या पिकास तयार केलेली जमीन. ६ सिद्धतिरूपी पिकाचा, ७ थोडेसें, अल्प.