पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा ३०५ मद्याजी चोख । याचि नांव || १८ || ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी । हें अंतःकरणींचें तुजपासीं । वोलिजत असें ॥ १९ ॥ अगा आघविया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें । तें पावोनि सुख संचलें । होऊनि ठासी ।। ५२० ।। ऐसें सावळेनि परब्रह्मे । भक्तकामकल्प में । बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ २१ ॥ अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुटी कां पुरा तैसा उगाचि असे || २२ || तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ २३ ॥ तही दातार हा आमुचा । म्हणोनि हैं बोलतां मैळेल वाचा । काय कीजेल ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ २४ ॥ परि वाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें | कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ २५ ॥ येतुलें हैं वाड सायासें । जंव बोलत असे दृढमानसें । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकं केलें ॥ २६ ॥ चित्त चाकाले आटु घेत । वाचा पांगुळली जेथींची तेथ । आपादकंचुकित | रोमांच आले ॥ २७ ॥ अर्धोन्मीलित डोळे । वर्पताति आनंदजळें । आंतुलिया सुखोमींचेनि वळें । बाहेरि कांपे ॥ २८ ॥ पैं आघवांचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी । लेइला ' मद्याजी' होणे होय. १८ असा जेव्हां तूं माझ्या ध्यासानें पूर्ण संपन्न होशील, तेव्हांच माझ्या स्वरूपास पावशील. हे आपल्या मनांतलें रहस्य मीं तुला आज प्रकट केलें आहे. १९ अरे, आम्हीं सर्वापासून आजपर्यंत जें गुप्त ठेवलें आहे, तें हें लाभून तूं सुखानें ओतप्रोत भरून राहाशील. " ५२० अशा रीतीनें, भक्तांचा कल्पवृक्षच अशा त्या ब्रह्मस्वरूप सांवळ्या श्रीकृष्णांनीं अर्जुनास बोध केला, असें संजय म्हणाला. २१ म्हातारा धृतराष्ट्र हे बोल स्वस्थपणे ऐकत होता. एकाद्या आळशी ऐदी म्हशासारखा तो आपला खुशाल मुकाट्यानें बसला होता. २२ तेव्हां संजय मान हालवून मनांत म्हणाला, “अमृताचा येथें सारखा वर्षाव चालला आहे, पण हा म्हातारा येथें असून नसल्यासारखाच आहे ! २३ पण हा आमचा पोशिंदा आहे, तेव्हां असें स्पष्ट बोलून वाचेला मळवणें योग्य नाहीं. याला इलाज नाहीं, कारण याचा स्वभावच असा आहे. २४ परंतु मी मोठ्या भाग्याचा खरा, कारण रणवृत्तांत सांगण्याच्या निमित्तानें श्रीव्यासमहाराजांनी मला निर्भय राखले आहे. " २५ अशा रीतीने मोठ्या प्रयासानं मन घट्ट करून संजय मनांतल्या मनांत बोलत आहे, तोंच त्याला न आवरेसा सात्त्विक भावाचा अपरंपार गहिंवर आला. २६ त्याच्या चित्ताला चक्कर आली, जीभ ली पडली, व सर्व अंगावर रोमांच उभे राहिले. २७ अर्धवट मिटलेल्या डोळ्यांतून आनंदाश्रु गळूं लागले, आणि अंतर्यामांत उसळणाऱ्या सुखाच्या लाटेनें त्याचें शरीर थरथर कांपू लागले. २८ त्याच्या रोमरोमांत धर्मजळाचे निर्मळ बारीक बिंदू असे चकाकूं लागले, की जणूं काय त्याने ३९