पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी प्रज्ञा जिरौनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणुनी ॥ ५१० ॥ जंब जंव वाळ वळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥। ११ ॥ जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचेंचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ १२ ॥ अगा मर हा वोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि अमतें जात न गणिती । गैहिंसपणें ॥ १३ ॥ दर्दुर सापें गिळिज आहे उभा । कीं तो मासियां वेंटाळी जिभा । तैसे प्राणिये कवणा लाभा | वाढविती तृष्णा ||१४|| अहा कटकटा हैं वोखटें । इये मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ १५ ॥ तरि झडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥। १६ ॥ सम०- मन्मना भव मद्भको मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ -मद्रूपीं मन मद्भक्त माझें यजन वंदन । मदाश्रित असे चित्त योजितां मज पावसी ॥ ३४ ॥ आर्या - मद्रूपीं मन ठेवीं भद्भक्ती करें मला नमीं यज रे । यापरि मनासि योजुनि मदाश्रयें पावशी मला गजरें ॥३४॥ ओवी - माझे ठायीं अंतःकरण । भक्तिरूप मज अर्पण । मजउद्देशें योग करून । योजितां मज पावसी ॥ ३४ ॥ तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारी । मज एकातें ॥ १७ ॥ माझेनि अनुसंधानें देख | संकल्प जाळणें निःशेख | , साठीमुळे ज्याची बुद्धि नाठी झाली आहे, त्याला 'वडील' म्हणून त्याच्या पायांवर लोटांगणे घालतात ! ५१० जों जों मूल वाढतें, तों तों आईबाप वगैरे मोठ्या कोडकौतुकानें नाचतात, पण मूल जसजसे वाढतें, तसतशी त्याच्या आयुष्याची दोरी घटते, याबद्दलचा खेद त्यांच्या गांवींही नसतो ! ११ जन्म पावल्यापासून दिवसेंदिवस अधिकअधिक काळाच्या आधीन व्हावें लागतें, तरीपण वाढदिवसाचे उत्सव मोठ्या थाटानें करतातच आणि आनंदाच्या गुढ्याही उभारतात. १२ अरे, लोकांना 'मरण हा शब्दही ऐकवत नाहीं, आणि कोणी मेला म्हणजे मोठें रखें काढतात, परंतु आपले असलेलें आयुष्य कमी कमी होत चाललें आहे, याचा ते गचाळ मूर्खपणानें विचार करीत नाहींत. १३ सापाकडून गिळला जात असलेला बेडूक जसा माशांना जिभेचं वेटोळे घालून पकडतो, तसेच हे प्राणी आपल्या वासना सारख्या वाढवीत असतात, पण यांत त्यांना काय लाभणार आहे ? १४ अरेरे, हाय हाय, या मृत्युलोकाची स्थिति कशी अगदींच उफराटी आहे ! अर्जुना, तूं आपल्या कर्मगतीनें येथें जन्मला आहेस, तरी पण आतां तूं याला झटकून लवकर मोकळा हो, आणि ज्या भक्तीच्या मार्गाने माझ्या निर्दोष अक्षय्य पदांचा तुला लाभ घडणार आहे, त्या मार्गाला लाग. १५,१६ तूं आपले मन मकर, माझ्या भजनांत प्रेमानें रंगून जा, आणि सर्व ठिकाणी माझें अस्तित्व जाणून मला वंदन कर. १७ माझ्याकडेच लक्ष लावून, सर्व संकल्पांची राखरांगोळी करणें म्हणजेच १ वाढदिवसाचे उत्सव. २ मूर्खपणानें. ३ दैववशात्.