पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा ३०३ बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें | आहे आघवें ॥ ५०० ॥ म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी | ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं । कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगेळांच्या ॥ १ ॥ जिये लोकींचा चंदु क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं । दुःख लेऊनि सुखाची अंगी । सळित जगातें ॥२॥ जेथ मंगळाचिया अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोहरी । मृत्यु उदराचिया परिवरी | गर्भ गिंवसी ॥ ३ ॥ जें नाहीं तयातें चिंतवी । तंव तेंचि नेहजे गंधवीं । गेलियाची कवणे गांवीं | शुद्धि न लगे ॥ ४ ॥ अगा गिंवसितां आघवां वाटीं । परतलें पाउलचि नाहीं किरीटी । सैंघ निमालियाचिया गोठी । तियें पुराणें जेथींचीं ॥ ५ ॥ जेथींचिये अनित्यतेची थोरी | करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी । कैसें नाहीं होणें अवधारीं । निपनियां ||६|| ऐसी लोकींची जिये नांदणूक | तेथ जन्मले आथी जे लोक । तयांचिये निश्चितीचे कौतुक | दिसत असे ॥ ७ ॥ पैंदृष्टादृष्टाचिये जोडी । लागीं भांडवल न सुटे कवडी | जे सर्वस्व हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ८ ॥ जो बहुवे विपयविलासें गुंफे । तो म्हणती वाई पडिला सोपें । जो अभिलापभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ९ ॥ जयाचं आयुष्य धाकुटें होय । वळ म्हणजे तें जसें हितकर होईल, तितपतच या मृत्युलोकीचें हें सर्व कल्याणकारक होणार आहे. ५०० म्हणून, या मृत्युलोकांत कोणाच्या कानाला खऱ्या सुखाची कथा ऐकण्यास लाभणार आहे ? अरे, विंचू ज्या अंथरुणांत आहेत, त्यावर स्वस्थ झोप यावी तरी कशी ? १ ज्या लोकींचा चंद्र क्षयरोगानें ग्रस्त आहे; जेथे केवळ अस्ताला जाण्याकरितांच सूर्य उगवतो; जेथे दुःख सुखाचें सांग घेऊन जगाला छळीत असतें; २ जेथे मंगळाच्या धुमान्यांत अमंगळाचा पोरकिडा तत्काळ पडतो; जेथें मृत्यु आईच्या पोटांतील गुप्त गर्भाशयांतसुद्धां गर्भाला गांठतो; ३ जेथें खोट्याच गोष्टीचा ध्यास लागतो; आणि मग तीच गोष्ट यमदूत हिरावून नेतात, पण कोठे नेतात याचा पत्ताही लागत नाहीं; ४ जेथे सगळ्या वाटा हुडकून पाहिल्या तरी या किचाटांतून सुटण्याला पाऊलवाटही सांपडत नाहीं, आणि, अर्जुना, जेथील पुराणें म्हणजे असंख्य जन मेल्याच्याच गोष्टी; ५ जेथील वस्तुमात्राच्या अशाश्वतपणाचे वर्णन जरी कोणी ब्रह्मदेवाच्या आयुष्याएवढ्या दीर्घकाळपर्यंत करीत बसला, तरीही तें झाडून सारें संपूर्ण वर्णन होऊं शकणार नाहीं; ६ अशी ज्या लोकींची अशाश्वत स्थिति आहे, तेथे जे जीव जन्माला आले, त्यांनी निश्चिंत रहावें, या गोष्टीचे कौतुक कसें करावं हें दिसतं आहे ! ७ अरे, दिसत्या किंवा न दिसत्या, म्हणजे लौकिक किंवा पारलौकिक लाभासाठीं गांठीची कवडीही सोडण्यास जे तयार होत नाहींत, तेच सर्वस्वीं हानिकारक वस्तूंकरितां धनाच्या कोडीही वेचतांना मागेंपुढे पहात नाहींत. ८ जो नाना तव्हांच्या विषयविलासांत गुरफटला आहे, त्याला 'हा सांप्रत सुखांत पडला आहे,' असें म्हणतात, आणि जो वासनांच्या भाराखाली दडपून गेला आहे, त्याला 'सज्ञान' समजतात ! ९ ज्याचें आयुष्य अत्यल्प उरलें आहे, आणि लोटांगणें १ विंचवांच्या २ आंगर्डे, वेष, सोंग, ३ पोरकिडा, पोरा. ४ सुखांत ५ सांप्रत.