पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०२ सार्थ ज्ञानेश्वरी शस्त्रवर्षी ॥। ४९० ।। आंगावरी पडतां पापाण । न सुवावें केविं वोडण । रोगें दाटला आणि उदासपण । वोखदेंसीं ॥ ९९ ॥ जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवि पांडवा । तेविं लोका येऊनि सोपद्रवा । केविं न भजिजे मातें ॥ ९२ ॥ अगा मातें न भजावयालागीं । कवण वळ पां आपुलिये आंगीं । काइ घरी की भोगीं । निश्चिंती केली ॥ ९३ ॥ ना तरी विद्या कीं वयसा । ययां प्राणियांसि हा ऐसा । मज न भजतां भरंवसा । सुखाचा कोण ॥ ९४ ॥ तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें । आणि एथ देह तंत्र असे पडिलें । काळाचिये तोंडीं ॥ ९५ ॥ बाप दुःखाचें कैणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचिये असे घडलें । हौटवेळे येणें ॥ ९६॥ आतां सुखेंसि जीविता । कैंची ग्राहिकी किजेल पांडुसुता । काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ॥ ९७ ॥ अगा विपाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥९८॥ तेविं विपयांचें जें मुख । तें केवळ परम दुःख । परि काई कीजे मूर्ख | न सेवितां न सरे ॥ ९९ ॥ कां शीस खांडूनि आपुलें । पायींच्या खेतीं कसें रहावें ? शस्त्रांची झड लागली असतां उघड्या अंगानें कसें असावें ? ४९० अंगावर शिळा कोसळत असतां, कोणतंही रक्षणाचे साधन घेऊं नये, हें घडावें तरी कसें? जो रोगानें बुजबुजला आहे, त्याने औषधाविषयीं निष्काळजी कसे राहावें ? ९१ चहू बाजूंला वणवा पेटला असतां, बाहेर पडण्याचा प्रयत्न न करणें हें शक्य तरी आहे काय ? तर मग, अर्जुना, दुःखसंकटांनीं भरलेल्या या मृत्यु- लोकाला येऊन, मला न भजणें, हें कसें बरें शोभेल ? ९२ अरे, मला न भजण्याइतका माजोरीपणा येण्याला जीवाच्या अंगीं असें बळ तरी कोणते आहे ? घरेदारे, विपयविलास, यांत असें काय आहे, कीं त्यांवर विश्वास टाकून खुशाल आनंदांत राहतां येईल ?९३ माझें भजन न करतां विद्या किंवा तारुण्य यांच्यापासून सुखाचा लाभ होईल असा प्राण्यांना भरंवसा धरतां येईल काय ? ९४ अरे, जे जे म्हणून विषयभोग आहेत, ते सर्व खरोखर एक देहाच्याच कारणी पडतात, आणि हा देह तर निरंतर काळाच्या तोंडांत पडलेला आहे ! ९५ जबरदस्त दुःखाच्या मालाच्या बोधी जिकडे तिकडे सुटल्या आहेत, आणि मृत्यूच्या गठ्याची सारखी रीघ लागली आहे, असा मृत्युलोकींचा जन्ममरणाचा बाजार भरला असतां, प्राण्याला तेथें येणें प्राप्त झाले आहे. ९६ मग, अर्जुना, अशा बाजारांत सुखाचा व्यवहार कसा होणार? अरे, राखाडी फुंकून कधीं दिवा पाजळला जातो काय ? ९७ अरे, विषारी कांदे वाटून, त्यांचा पिळून रस काढावा, आणि मग त्या रसाला 'अमृतरस' नांव ठेवून तो प्यावा; अशा करणीनें जसें अमर होऊं पहावें, ९८ त्याप्रमाणें विषयांपासून होणारे जें सुख तें केवळ महादुःख आहे, परंतु काय करावें ? मूर्ख जे आहेत ते त्यांचं सेवन केल्याशिवाय रहात नाहींत. ९९ किंवा आपले शिर तोडून पायावरच्या जखमेला तें बांधावें, १ मालाचे भारे. २ गट्टे, गोरड्या ३ बाजार भरल्या वेळीं. ४ क्षतावर,