पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा ३०१ केली परौती | फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं । मग वोडवली वक्षःस्थळाची वाखती । चरणरजा ॥ ४८० ।। आझुनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा । जे आपुलिया देवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ८१ ॥ जयांचा कोप सुभटा | काळामिरुद्राचा वसौटा। जयांचे प्रसादी फुकटा | जोडती सिद्धि ॥ ८२ ॥ ऐसे पुण्यपुंज जे ब्राह्मण । आणि माझ्याठायीं अतिनिपुण । आतां मातें पावती हैं कवण | समर्थावें ॥ ८३ ॥ पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळें । तिहीं निर्जिवींही देवांची निडळे | बैसणीं केलीं ॥ ८४ ॥ मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हैं समर्थावें । तेव्हां कायी साच ॥ ८५ ॥ जेथ निववील ऐशिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजेत असे शिरसा । निरंतर ॥ ८६ ॥ तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहून आगळा । तो चंदनु केविं अवलीळा | सर्वांगीं न वैसे ॥ ८७ ॥ कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥ ८८ ॥ म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गतिमति मीचि शरण्य । तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितीही मीचि ॥ ८९ ॥ यालागीं शतजर्जर नावे | रिगोनि केविं निश्चिंत होआवें । कैसेनि उघडिया असावें । 1 कौस्तुभमण्याची अडचण होते म्हणून तोही काढून हातांत घेऊन, ज्यांच्या चरणरजाच्या लाभाकरितां मी आपले वक्षःस्थलाचें पुट पुढे केलें ; ४८० आणि अर्जुना, माझ्या भाग्यशालीपणाची जतन व्हावी म्हणून ज्यांच्या पायाची शुभ मुद्रा मी अजूनही आपल्या हृदयावर मिरवीत असतों; ८१ ज्यांच्या क्रोधाग्नींत प्रत्यक्ष रुद्राचें वास्तव्य आहे, आणि ज्यांच्या कृपेंत अटमहासिद्धि सहज फुकटाफुकट हाताला येतात; ८२ अशा प्रकारचे जे परम पुण्यवान् ब्राह्मण आहेत आणि जे माझ्या स्वरूपांत लीन झालेले असतात, त्यांना माझा लाभ होतो, हें सांगितलेच पाहिजे असें नाहीं. ८३ अरे, चंदनाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याच्या संसर्गानें आसपासचे निववृक्षही सुगंधी होऊन त्या जड वृक्षांनीही देवांच्या मस्तकावर स्थान मिळविलें, ८४ मग तो प्रत्यक्ष चंदन तें स्थान पावणार नाहीं, असें घडावें तरी कसे? किंवा तो तें स्थान लाभेल, हें सांगण्याची आवश्यकता तरी काय आहे ? ८५ अरे, हालाहलप्राशनानें दाह झाला असतां, चंद्राच्या स्पर्शानें तो दाह शांत होईल, अशा आशयानेच जर शंकराने अर्धाही चंद्र निरंतर मस्तकीं धारण केला आहे, ८६ तर दाह शांत करण्याचा ज्याचा गुण प्रत्यक्ष अनुभवाला आला आहे, जो सगळा आहे, आणि सुवासानें चंद्राहूनही श्रेष्ठ आहे, असा चंदन सर्व अंगांना सहजच लेपून कां राहणार नाहीं ? ८७ अथवा, ज्या गंगेचा आश्रय घेऊन रस्त्यांतले पाण्याचे पाटसुद्धां समुद्राला मिळाले, ती गंगा स्वतः समुद्राला मिळत नाहीं, असें घडेल तरी कसें ? ८८ तर मग जे राजर्षि किंवा ब्राह्मण जीवाभावाने मलाच आपलें शरण्य म्हणजे रक्षणाचे साधन समजतात, त्यांचे अखेरचे शाश्वत सुखाचें स्थान मीच होतों, यांत तिळमात्रही संदेह नाहीं. ८९ तेव्हां जिला शंभर छिद्रे पडली आहेत, अशा नावेंत स्वस्थ पडून