पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०० शि. 750 सार्थ श्रीज्ञानेश्वरी पार्था पाहीं पाया माझ्या ठायीं । उपायांची नाहीं । वाणी एथ ॥ ७१ ॥ आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ७२ ॥ अगा कवणें एके वोलें । माझेपण जन्ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ||७३|| यालागीं पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना | माझिया येती ॥ ७४ ॥ किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥३३॥ सम० - पुण्य ब्राह्मण राजर्षी यांचे नवल कायसे । या दुःखा मृत्युलोकीं तूं पावुनि भज गा मज ॥ ३३ ॥ आर्या-मग तो भक्त ब्राह्मण राजर्षी पुण्य पावतील निका । मज तूं भज हा पावुनि नश्वर नर-लोक थोर दुःखनिका ३३ ओवी - यापरी द्विजभक्त पुण्यवंत । राजऋषि पावती समस्त । अनित्य असुख लोक पावुनी त्वरित । मज भजें तूं ॥ ३३ ॥ मग वर्णामाजी छेत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार | मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ७५ ॥ पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थासि दैव । उदयलें जें ॥ ७३ ॥ जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वैज्रांगी। जयांचिये दिठीचिया उत्संगी | मंगळ वाढे ॥ ७७ ॥ जयांचिये आस्थेचेनि वोलें । सत्कर्म पोल्हाळी गेलें । संकल्पें सत्य जियालें । जयांचेनी ॥ ७८ ॥ जयांचेनि गा वोलें । अनीसि आयुष्य जाहालें । म्हणोनि समुद्रे पाणी आपुलें । दिधलें याचिं प्रीती ॥ ७९ ॥ मियां लक्ष्मी डावलोनि मनोधर्माच्या मार्गानें येवोत. ४७० म्हणून, अर्जुना, माझ्या स्वरूपांत प्रवेश करण्याला उपायांचा मुळींच तोटा नाहीं. ७१ अरे, कोणत्याही जातींत जन्माला यावें, आणि खुशाल भक्ति करावी किंवा विरोध करावा, पण माझाच भक्त किंवा शत्रु व्हावें हें मुख्य तत्त्व आहे. ७२ अरे, कोणत्याही मिषाने जर माझेपण प्राप्त झाले, तर माझें स्वरूप आपल्या हातांतच आलें असें स्वच्छ समजावें. ७३ म्हणून, अर्जुना, पापयोनि असो, कीं वैश्य, शूद्र, अथवा स्त्री असो, तीं सर्व माझ्या उपासनेने माझ्या स्थानाप्रत पावतात. ७४ अशी जर खरोखर स्थिति आहे, तर मग जे चातुर्वर्ण्याचे राजे, स्वर्गाचे धनी, मंत्रविद्येचें माहेरघर, असे जे ब्राह्मण; ७५ जे भूदेव, जे तपाचे मूर्तिमंत अवतार, ज्यांच्या योगानें तीर्थाचेंही भाग्य उदयाला येतें; ७६ जे यज्ञयागाचे निरंतरचे आधार, जे वेदांचे निःसीम अभिमानी, आणि ज्यांच्या कृपाच्या मांडीवर कल्याणाला बाळसे चढून तें वाढीस लागतें; ७७ ज्यांनीं आदरल्यामुळे सत्कर्म विस्तार पावलें आहे, ज्यांच्या इच्छेनें सत्याचा जिवंतपणा टिकला आहे; ७८ ज्यांच्या अभयवचनानें अग्नीला आयुष्य लाभलें आणि म्हणून अग्नीचा सहज शत्रु जो समुद्र त्यानेही त्या वडवाग्नीला आपलं जळ पाजून त्याचें पोषण केले आहे; ७९ प्रत्यक्ष लक्ष्मीलाही बाजूस ढकलून आणि १ छत्रचामराचे अधिकारी, राजे, श्रेष्ठ. २ आंदण ३ अमेय, चिलखत ४ ओलाव्याने ५ विस्तारले ६ आपल्या बापास त्रास देणाऱ्या हैहयनुपांच्या नाशासाठीं और्व ऋपने नाशक अभि उत्पन्न केला, परंतु आपल्या बापाच्या आज्ञेनेच त्याने तो समुद्रांत टाकला आणि तेथे त्या अम्मीने समुदाने आपल्या पाण्याने पोषण केलें, हाच और्वानल किंवा वडवाभि. ही कथा येथे उद्दिष्ट आहे.