पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २९९ काष्ठे | हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटे । अमीमाजीं ।॥ ५९॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शुद्ध अंत्यजादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ।। ४६० ।। मग जातीं व्यक्ती पडे विंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजी ॥ ६१ ॥ तंववरी नदनदींचीं नांवें । तंवचि पूर्णपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजी ॥ ६२ ॥ हेंचि कवणें एके मिसें । चित्त माझे ठायीं प्रवेशे । येतुले हो मग आपैसें । मिचि होणें असे ॥ ६३ ॥ अगा वरी फोडावयालागीं । लोहो मिळो कां परिसाचे आंगीं । कां जे मिळतिये प्रसंगी | सोनंचि होईल ॥ ६४ ॥ पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया ब्रजांगनांचीं निजें । मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हती ॥ ६५ ॥ ना तरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें । कीं अखंड वैरवशे । चैद्यादिकीं ॥। ६६ ।। अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां । कीं ममवें वसुदेवा । दिकां सकळां ॥६७॥ नारदा ध्रुवा अक्रूरा | शुका हन सनत्कुमारा । इयां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥ ६८ ॥ तैसाचि गोपिकांसि कामें । तया कंसा भयसंभ्रमें । येरां घातकें मनोधर्मै । शिशुपालादिकां ।। ६९ ।। अगा मी एकलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मागें । भक्ती कां विपयविरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥ म्हणोनि विस्तवामध्ये पडून एकरूप झालीं नाहींत, तोपर्यंतच जशी लांकडांची चंदन, खैर, अशी वर्गवारी करतां येते; ५९ तशात्र, जोपर्यंत माझ्या स्वरूपाशीं समरस होणें घडलें नाहीं, तोंपर्यंत क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, शूद्र, अंत्यज, अशा जाति भासमान होतात. ४६० पण ज्याप्रमाणें समुद्रांत टाकलेले मिठाचे कण त्यांत लीन होऊन जातात, त्याप्रमाणें जातिभेदाच्या भासाचा, माझ्याशी समरस झाल्यानें, सर्वस्वीं लोप होतो. ६१ जोंपर्यत समुद्र गांठला नाहीं, तोपर्यंतच निरनिराळ्या नदनद्यांची कल्पना असते, व हे प्रवाह पश्चिमेचे आणि हे दुसरे पूर्वेचे, असा भेद करतां येतो. ६२ तेव्हां सांगणे इतकेंच आहे, कीं, कोणत्या तरी निमित्तानें एकदा चित्ताचा प्रवेश माझ्या स्वरूपांत झाला पाहिजे, म्हणजे मग तें आपसूकच मद्रूप होऊन बसतें. ६३ अरे, पारसाला फोडण्याच्या उद्देशानें कां होईना पण एकदा लोखंडानें परिसावर लागावें हें बरें, कारण त्या परिसाचा संग होतांक्षणींच तें सोनंच होईल. ६४ अर्जुना, पहा बरें, प्रेमाच्या निमित्तानें त्या गोपींचीं अंतरंगें माझ्या ठिकाणीं रंगतांच त्या मप झाल्या नाहींत काय ? ६५ तसेंच भयाच्या निमित्तानें कंस, निरंतर शत्रुत्वानें शिशुपाळ इत्यादि शत्रु, सोयरेपणानें यादव, आणि ममतेच्या निमित्तानें वसुदेवादिक, हे सगळे माझ्याशीं एकरूपता पावले नाहीत काय ? ६६,६७. ज्याप्रमाणे नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, आणि सनत्कुमार, यांना मी भक्तिगुणानं साध्य झालों, तसाच, अर्जुना मी कामभावनेनें गोपना, भयभ्रांतीनें कंसाला, आणि शिशुपालादिक इतरांना त्यांच्या दुटन मनोवृत्तींनी लाभलों. ६८,६९ अरे, मी सर्वाचं अखेरचें ध्येय आहे, मग ते माझ्याकडे भक्तीनें, कीं विषयभावनेनें, कीं वैरवृत्तीने, किंवा दुसऱ्या कोणत्याही १ शून्य, पूज्य, २ अखेरचें. ३ स्थान, ध्येय.