पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां । परि मजमीं तुकितां तुका । तुटी नाहीं ॥ ४९ ॥ पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें। माझें नृसिंहत्व लेणें। जयाचिये महिमे ।। ४५० ॥ तो प्र-हादु गा मजमाठीं । घेतां बहुतें सदा किरीटी । कां जें मियां द्यावें तें गोष्टी | तयांचिया जोडे ॥ ५१ ॥ एहवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही मरी न लाहे उपरें । म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ।। ५२ ।। राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती । तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ५३ ॥ वांचूनि सोनं रूपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ ५४ ॥ तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तेंचि सर्वज्ञता सरे । जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ ५५ ॥ म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण | सार्थक एक ॥ ५६ ॥ तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो ॥ ५७ ॥ जैसे तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ | मग होऊनि ठाकती केवळ | गंगारूप ॥ ५८ ॥ कां खैर चंदन माझाच एक आधार घेतला, ४८ ते जरी पापयोनींत जन्मले असले, ते जरी विद्याहीन असले, तरी त्यांची जर माझ्याबरोबर तुलना केली, तर बरोबरींत ते एक रतीही कमी भरणार नाहींत. ४९ अर्जुना, लक्षांत घे, कीं, या भक्तीच्या संपन्नतेनेंच दैत्यांनींही देवांना खाली पहावयास लाविलें आहे. अरे, माझा भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळांत जन्मला होता, पण त्याच्या निर्मळ भक्तीच्या ओढस्तव मी नृसिंह अवतार धारण करून जगांत मिरवलों ! ४५० त्या प्रल्हादाला माझ्याकरितां अनेकांनीं नाना परींनीं छळलें, त्यामुळें, अर्जुना, मीं जें कांहीं द्यावें तें त्याच्याच शब्दाने यावें ! ५१ नाहींतर त्याचं कुट धडधडीत दैत्याचें होतें, परंतु इंद्रालाही त्याच्यावर कडी करतां आली नाहीं. तेव्हां, मुख्य तत्त्व हें कीं, एक भक्तीच येथें उपयोगी पडते, जातीला कांहींच महत्त्व नाहीं. ५२ राजाज्ञेचीं अक्षरें एकाद्या चामड्याच्या तुकड्यावर उठविण्यांत आली म्हणजे त्या चर्मखंडाच्या मोबदला सर्व वस्तू मिळू शकतात. ५३ तोच राजाज्ञेच्या अक्षरांचा ठसा नसेल, तर सोन्यारुण्याच्या तुकड्यांनाही कोणी हातीं धरीत नाहींत. तेव्हां सर्व माहात्म्य राजाज्ञेचें आहे आणि राजाज्ञेच्या अक्षरांनीं अंकित झालेले एकादें चर्मखंड जर लाभेल तर त्याच्याच साह्यानें वाटेल ती वस्तु विकत घेतां येते. ५४ त्याप्रमाणेच जेव्हां माझ्या प्रेमानें मन आणि बुद्धि हीं तुडुंब भरून जातात, तेव्हांच मोठेपणा व सर्वज्ञता हीं उपयोगी पडतात. ५५ म्हणून कुळ, जाति, इत्यादि सर्व व्यर्थ वंडे आहेत; अर्जुना, माझेपणांत, माझ्या खऱ्या भक्तींतच खरें धन्यत्व आहे. ५६ मग भक्तिभाव कोणत्याही स्वरूपाचा असो; एकदा त्या भावाने भारलेलें मन माझ्याआंत प्रविष्ट झालें, म्हणजे त्यापूवींचें सर्व चरित्र पुसल्यासारखंच होते. ५७ गंगाजळांत मिसळले नाहींत, तोपर्यंत नाले, ओढे, वगैरे निराळे ओळखण्यांत येतात, पण एकदा ते गंगाजळांत मिसळले, कीं जसे गंगारूपच होतात ५८ किंवा, जोपर्यंत १ पंडित, शास्त्र पढलेले. २ त्याच्या शब्दानें.