पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २९७ जियापरी ।। ३९ ।। तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे । तेणें संसारदुःखासि भाणें । वोगरिलें ॥ ४४० ॥ म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजही व्हावें । वरि देहाचेनि नांवें । पशुचेंही लाभो ॥ ४१ ॥ पाहें पां सावजें हातिरूं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें । कीं तयाचें पशुत्व वाव जाहलें । पावलिया मातें ॥ ४२ ॥ मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः । स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् सम० चांडाळादिक जातीनें पापी तेहि महागति । पावती भजतां मातें स्त्रिया वैश्यहि शुद्धही ॥ ३२ ॥ आर्या-माझा आश्रय करुनी जे कोणी पापयोनिच्या देहीं । स्त्री वैश्य शूद्ध तैसे जाती गति पर न पडुनि संदेहीं ॥३२॥ ओवी - स्त्री वैश्य शूद्र आदिकरून । पापयोनि असोन । माझी भक्ति केलियानें । तयांसी जाण परमगति ॥ ३२ ॥ अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमाचिये शेवटीं । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥ ४३ ॥ ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे कां दगड | परि माझ्या ठायीं दृढ । सर्वभावें ॥ ४४ ॥ जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रूप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४५ ॥ माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगी भूषण | माझी सेवा ॥ ४६ ॥ जयांचें ज्ञान विपो नेणे । जाणीव मज एकातेंचि जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एन्हवी मरण ॥ ४७ ॥ ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मीचि केला ॥ ४८ ॥ ते भक्तिहीन पुरुषाचें जीवितचरित्र असतें. त्यांत स्वप्नांत सुद्धां पुण्यकृत्य घडत नाहीं. तें जीवित म्हणजे संसारदुःखांना वाढलेले पक्वान्नांचे ताट होते. ४४० म्हणून, उत्तम कुळ नको, जात अंत्यजाची असली तरी चालेल, इतकेंच नव्हे, पशूचं शरीर असले तरीही अडचण नाहीं. ४१ अर्जुना, असे पहा, सावजाने म्हणजे नकाने गजेंद्र नांवाच्या हत्तीला पकडीत धरलें, तेव्हां त्या गजेंद्राने माझा धावा केला; अशा प्रकारें भक्तिपूर्वक माझं स्मरण केल्याबरोबर तो मद्रूप झाला, आणि त्याचं पशुत्व तेव्हांच व्यर्थ झाले. ४२ अर्जुना, ज्या नांवांचा उच्चारही निंद्य आहे, अशा नांवांच्या हीन जातींतली अत्यंत हीन जाती, अशा पापयोनींत जे जन्मास आले आहेत; ४३ अशा पापयोनींत जन्मून शिवाय जे ज्ञानाच्या नांवानें केवळ फत्तर आहेत, परंतु ज्यांची माझ्या ठिकाणी सर्व जीवभावांनीं भक्ति जडून, ४४ ज्यांची वाणी निरंतर माझेंच गीत गाते, ज्यांची दृष्टि निरंतर माझेंच रूप पाहाते, ज्यांचं मन निरंतर माझ्याविषयींच संकल्प करतें, ४५ माझ्या कीर्तिश्रवणावांचून ज्यांचे कान कधींच रिते असत नाहींत, माझी परिचर्या हेच ज्यांच्या गात्रांना भूषण वाटते, ४६ ज्यांना विषयाचें भान नसतें, जे केवळ एकट्या मलाच जाणतात, आणि या सर्व गोष्टी अशा न घडल्या तर ज्यांना आपलें जिणें निव्वळ मरणासारखे वाटतें, ४७ अर्जुना, अशा रीतीनं ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींनी जीवनासाठी १ ता. २ वाढले. ३८