पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥ २९ ॥ एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती । जरी मियां चाड तरी भक्ति । न विसंविजे गा ।। ४३० ॥ अगा कुळाचिया चोखटपणा न लगा । आभिजात्य झणें श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वाहावा ।। ३१ ।। कां रूपवयसा माजा । औथिलेपणें कां गाजा । एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ||३२|| कणेंविण सोपटें । कणसें दाटली घनदाटें । काय करावें गोमटें । वोस नगर | ३३ ॥ ना तरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें । कां वांझ फुल फुललें । झाड जैसें ||३४|| तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळ जाति गौरव । जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ||३५|| तैसे माझिये भक्तीविण । जळो तें जियालेपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई || ३६ | | मैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली । तैसीं पुण्यें डावलून गेलीं । अभक्तांतें ॥ ३७ ॥ निंब निंबोळिया मोडोनि आला । तरि तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोपांचिलागीं ॥ ३८ ॥ कां पड्स खापरी वाढिले | वाढूनि चोहटां ठेविले । ते सुणियां चींऐसे झाले । किंबहुना माझ्या जीवितानेंच तो जिवंत राहातो. २९ अर्जुना, या विषयाचे आतां चर्वितचर्वण किती करावें ? मुख्य तत्त्व हैं, कीं, जर माझी प्राप्ति व्हावी अशी इच्छा असेल, तर माझी सर्वस्वं भक्ति करण्यास विसंवतां कामा नये. ४३० अरे, वंशाच्या शुद्धपणाचे महत्त्व पाहू नका; कुलीनत्वाचे देव्हारे माजवू नका; आणि हा ज्ञानाचा तरी खोटा सोस कशाला बाळगतां ? ३१ रूपलावण्यानें किंवा यौवनवळाने माजोरी कां व्हावें ? द्रव्याढ्यतेनें अहंतेच्या गर्जना कशाला कराव्या ? कारण, जर एक माझी भक्ति नसेल, तर हे सर्व निष्फळ होऊन जातं. ३२ कणसें अगदी दाट लागलीं आहेत, पण ती जर कणांवांचून फोंस असतील, आणि नगरी मोठी दुमदार आहे, पण ती जर ओसाड असेल, तर त्यांचे काय महत्त्व आहे ? ३३ किंवा, जसें आटलेले सरोवर, किंवा रानांत दुबळ्याची दुबळ्याशीं गांठ, किंवा वांझ फुलांनी बहरलेलें झाड, ३४ तसें तें सर्व वैभव, कुळाचें थोरपण, किंवा जातीचं महत्त्व, समजावें. अरे, शरीराला यथासांग सर्व अवयव आहेत, पण जीव तेवढा नाहीं, अशा स्थितीत जसें तें शरीर निरुपयोगी होतें, तसेंच ज्यांत माझी भक्ति नाहीं, तें जीवितही केवळ धिक्कारास पात्र ठरते. कारण, अशा रीतीनें जगणाऱ्या जीवांत आणि पृथ्वीतळावर असणाऱ्या फत्तरांत फरक तो कोणता ? ३५, ३६ कांटेरी निवडुंगाच्या दाट सावलीला शाहाणे जसे टाळून जातात, तशीं खरीं पुण्यं अभक्ताला टाळून जातात. ३७ निंवाचें झाड निंबोळ्यांनी अगदीं मोडून जाण्याइतकें भरून आले, तर तो कावळ्यांचीच दिवाळी पिकवतो, त्याप्रमाणेंच असा भक्तिहीन पुरुष भरभराटीस चढला, तर तो दोषांचाच फैलाव करतो. ३८ असें पहा, कीं, पड्स अन्न खापरांत वाढावें आणि चव्हाट्यावर नेऊन ठेवावें, म्हणजे तें जसे कुत्र्यांना चाईच्या रोगासारखंच होतें, (कारण, कुत्रीं तें अन्न खातात आणि मग त्यांना चाईचा केंस गळून चट्टे पडण्याचा रोग होतो. ) ३९ त्याप्रमाणेच १ लावण्यानें व तारुण्यानं. २ धनाढ्यतेने. ३ निरर्थक पसारा. ४ रिकामी फोस. ५ कांटेरी निवडुंगाची. ६ चाईच्या रोगासारखे.