पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २९५ अनुतापतीर्थी न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥ तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । आभिजात्य तेंचि निर्मळ | जन्मलेयाचें फळ | तयासीच जोडलें ॥ २१ ॥ तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥ २२ ॥ हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा । जयाची अखंड गा आस्था | मजचिलागीं ॥ २३ ॥ अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेची पेटी । मजमाजीं किरीटी । निक्षेपिली जेणें ॥ २४ ॥ क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति । कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१ ॥ सम० -- तो होतो शीघ्र धर्मात्मा पावे तो शांति शाश्वती । पार्था मद्भक्त नासेना हे जगीं पैज घालिं तूं ॥ ३१ ॥ आर्या-सरवर होतो सुकृती पावे स्थिर शांति नमिति ज्या ज्ञाते । मद्भक्तां नाश नसे केरिं कौंतेया अशा प्रतिज्ञांतें ॥ ३१H ओंवी-ते तत्काळ धर्मी होऊन । निरंतर शांती असती पावून । माझिया भक्तांसि जाण । नाश नाहीं अर्जुना ॥३१॥ तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसा हन भाव तुज जाईल । हां गा अमृताआंत राहील | तया मरण कैंचें ॥ २५ ॥ पैं सूर्य जे वेळां नुजे । तया वेळा की रात्रि म्हणजे । तेवं माझिये भक्तीवीण जें कीजे । तें महापाप नोहे ।। २६ ।। म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पांडुसुता । तेव्हांच तो तत्त्वता । स्वरूप माझें ॥ २७ ॥ जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हैं नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥ २८ ॥ मग माझी नित्य शांति । तया दशा तेचि कांती । जरी दुराचारी असला, तरी पश्चात्तापाच्या तीर्थात सुस्नात होऊन जर सर्व जीवेंभावें तो माझ्या स्वरूपीं प्रविष्ट झाला, ४२० तर त्याचेच कुन्द्र पवित्र समजावें, त्याचंच कुलीनत्व खरें निर्दोष, आणि जन्माचें सार्थक त्यानंच खरोखर केलें. २१ त्याला विद्या, तप, अष्टांग योग, हीं सर्व जोडल्यासारखीं होतात. २२ अर्जुना, आतां हा विस्तार पुरे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे ज्याला माझी अखंड गोडी लागली, तो सर्वस्वीं सर्व कर्माच्या पार होतो. २३ ज्यानें आपल्या मनाच्या व बुद्धीच्या सर्व क्रिया एकनिप्रेच्या पेटींत भरून, ती पेटी सर्वस्वीं माझ्या स्वाधीन केली, तो अशा प्रकारें कर्मातीत होतो. २४ 'माझा भक्त कांहीं काळानंतर म्हणजे मृत्यूनंतर मजसारखा होईल,' अशी कल्पना जर तुझ्या मनांत उद्भवली असेल, तर मी तुला विचारतों, कीं, जो अमृतांतच राहतो, त्याला मरण कसें गांठणार ? २५ ज्या वेळी सूर्य उगवलेला नसतो, त्या वेळेला रात्र म्हणतात; तद्वत्च माझ्या भक्ती- वांचून जें जें करण्यांत येतें तें तें महापापच म्हणावयास नको काय ? २६ याकरितां, अर्जुना, त्याच्या चित्तवृत्ति माझ्याजवळ येतांक्षणीच तो खरोखर माझे स्वरूप पावतो. २७ ज्याप्रमाणें एका त्या दिव्यावर दुसरा दिवा पेटवावा, आणि मग त्यांपैकी अगोदरचा तेवणारा कोणता हें जसें ओळखूं येत नाहीं, तद्वत् जो जीव सर्व भावेंकरून माझी भक्ति करतो, तो तत्काळ मद्रूपच होऊन राहातो. २८ मग माझी जी अक्षय शांतवृत्ति आहे, तीच त्याला प्राप्त होऊन तेजस्विता चढते;