पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आंगावरी आहेचवाणें । तैसें देहधरणें । उदास तयांचें ॥ १२ ॥ परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें बोस फूल राहे देठीं । तैसें आयुष्याचिये मुठी | केवळ देह ॥ १३ ॥ येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठां जाहाला ॥ १४ ॥ अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥ सम० - जरी असे दुराचारी भजे मज न आणिकां । तो तूं साधूचि मानावा कीं त्याचा दिव्य निश्चय ॥ ३० ॥ आर्या - असुनि दुराचारीही मजला होउनि अनन्य जो भजतो। साधुचि तो मानावा निश्चय त्याचा बरा गमे मज तो ॥३०॥ ओवी - असो दुष्ट दुराचारी । मातें भजे अनन्य भक्तीनें जरी । तरी तुवां तो साधूच मानावा परी । कीं त्याचा दिव्य निश्चय ॥ ऐसें भजतेनि प्रेमभावें । जया शरीरही पाठीं न पैवे । तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥। १५ ।। आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर से वांटा । परि जीवित वेंचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥ १६ ॥ अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणोनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥ १७ ॥ तो आधी जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं । जैसा बुडाला महापूरीं । न मरतु निघाला ॥ १८ ॥ तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडालेपण जेविं वायां गेलें । तेविं नुरेचि पाप केलें | शेवटलिये भक्ती ॥ १९ ॥ यालागीं दुष्कृति ही जाहला । तरि त्याविषयीं आपलेपणा वाटत नाहीं, तसाच ते भक्त जरी देह धारण करतात, तरी त्याविषयीं त्यांना आपलेपणा वाटत नसतो. १२ वान्यावरोवर सुवास पुढे निघून गेल्यावर मागें रितें झालेले फूल कोमेजून गळून जाईपर्यत देंठाला डकून राहतें, तद्वत् आपलेपणा ज्यांतून निघून गेला आहे असा त्या भक्ताचा देह अंतकाळ येईपर्यंत आयुष्याला धरून राहतो. १३ अर्जुना, कर्तेपणाचा जो अभिमान, तो माझ्यावर आरोपल्यामुळे तो माझ्या ठिकाणीच ठाम होतो, आणि माझ्या भक्ताला कोणत्याही प्रकारे बंधक होत नाहीं. १४ अशा निर्मळ प्रेमभावानें भजणाऱ्याला त्याचें शरीरही बाधा करीत नाहीं, मग तो कोणत्याही जातीचा असला तरी काय हरकत आहे ? १५ आणि वीरश्रेष्ठा अर्जुना, त्याच्या आचरणाचा विचार करतां, जरी तो शेलका दुराचारी आढळून आला, तरी जीविताच्या अंतीं देहपाताच्या वेळीं त्यानें भक्तीच्या चबुतऱ्यावर आरोहण केलें होतें, हें विसरून चालावयाचें नाहीं. १६ अरे, अंतकाळीं जशी बुद्धि होईल, तीप्रमाणेच पुढील गतीचं स्वरूप ठरते; म्हणून ज्यानें अखेर आपलें जीवित भक्तीच्या भरांत संपविलें, तो पूर्वी जरी दुराचारी असला, तरी आतां त्याला भक्तीच्या पावन सामर्थ्यानें सर्वश्रेत्र गणले पाहिजे. एकादा पुरुष महापुरांत बुडाला, पण न मरतां पुढें बाहेर निघाला, १७, १८ तर त्याचें जीवित परत या थडीला आल्यामुळें जसें त्याचें पूर्वीचें बुडालेपण वायां होतें, तसेच अंतकाळच्या भक्तीनें पूर्वी आचरलेलें पाप पुसलें जातें. १९ म्हणून, एकादा पुरुष १ वरवरचें, वरकरणी २ कर्तेपणाचा अभिमान. ३ प्रविष्ट, टाण घेतलेला ४ पाठीस लागत नाहीं, बाधा करीत नाहीं. ५ शेलका चांदा.