पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २९३ उगाणिलें मज कर्म । तेव्हांच पुसिलें मरणजन्म | जन्मास श्रम | वैरचिलही गेले ॥ ४ ॥ म्हणऊनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळ नव्हेल भारी । हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥ ५ ॥ या देहाचिये वांदोडी न पडिजे । सुखदुःखाचिया सागरीं न बुडिजे । सुखे सुखरूपा घडिजे । माझियाचि आंगा ॥ ६॥ समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥१९॥ सम० - सम मी सकळां भूर्ती न द्वेषी मज न प्रिय । परि जे भजती प्रेम मी त्यांत मजमाजिं ते ॥ २९ ॥ आर्या-मी समसवां भूतीं न प्रिय न द्वेष्यही मज रमा जी। मज भजती जे प्रेमें मी त्यामाजींहि तेहि मजमाजीं ॥२९॥ ओवी - मी सर्व भूतांचे ठायीं । मी समबुद्धि असे पाहीं । मज वैरी मित्र द्रोही । समचि असे ॥ २९॥ तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरू ऐसा । भागु नाहीं ॥ ७ ॥ जे ऐसिया मातें जाणोनी । अहंकाराचा कुरुठा मोडोनी । जे जीवेंकर्मैकरूनि । मातें भजले ॥ ८ ॥ ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझ्या ठायीं । आणि मी तयांच्या हृदयीं । समग्र असें ॥ ९ ॥ सविस्तर वत्व जैसें । वीजकणिकेमाजीं असे । आणि वीजकणु वसे । वटीं जेवीं ॥ ४१० ।। तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेर नामाचींचि अंतरें । वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥ ११ ॥ आतां जीयांचें जैसें लेणें । " जीवाला कोणत्या तरी देहाचा आश्रय करावा लागतो, ३ पण तें कर्मच जर झाडून सर्व मला अर्पण करण्यांत आलें तर त्याच वेळीं जन्ममरणाचें ठावठिकाणही पुसलें जातें; मग जन्मनाशाबरोबर त्याच्या अनुषंगाने असणारे वरकड श्रमही आपोआपच नाहींसे होतात. ४ एकंदरींत, अर्जुना, 'आजच काय घाई आहे, पाहूं उद्यां,' असें म्हणून उद्यांवर चालढकल करण्याला आपल्याला फारसा वेळ नाहीं, म्हणून आत्मस्वरूप पावण्याचा जो अगदीं सोपा उपाय, तो फलसंन्यासयुक्त कर्मयोग मी तुला उपदेशिला आहे. ५ या देहाच्या बंदींत अडकूं नको, सुखदुःखसमुद्रांत गटंगळ्या खाऊं नको; तर सहजासहजी या सोप्या मार्गानें खुशाल माझ्या आनंदमय स्वरूपांत मिसळून रहा. ६ 'तो मी कसा आहे,' असे विचारशील, तर मी सर्व भूतांमध्यें समभावानेंच असतो. आपपर हा भेदभाव माझ्या ठिकाणीं तिळमात्र नसतो. ७ जे जीव माझें शाश्वत सत्य स्वरूप जाणून आणि अहंकाराचा ठाव पुसून, सर्व भावानें व सर्व कर्मानें मला भजतात, म्हणजे आपले जीवभाव व कर्ममात्र मला अर्पण करतात, ८ ते जरी देहांत राहात असले तरी ते वास्तविक देहांत नसतात, तर ते माझ्या स्वरूपांतच सर्वस्वीं राहतात आणि मीही त्यांच्या ठायीं वसत असतों. ९ लहान बीजाच्या कणांतच आपल्या विस्तारासह वटवृक्ष लीन स्थितींत असतो, आणि ती बीजाची कणी वटवृक्षांत असते, ४१० तद्वत् आमच्यांत आणि अशा भक्तांत केवळ बाह्यात्कारी नांवाचेंच अंतर असतें, परंतु आंतील वस्तुस्थितीचा विचार केला, तर मी म्हणजे तेच, आम्हांत भेदच नसतो. ११ जसा दुसऱ्याचा उसना आणलेला दागिना आपण वरकरणी अंगावर घातला, तरी १ झाडून सर्व अर्पण केलें. २ वरकड ३ उद्यांचा. ४ उसने आणलेलें व परत करण्याचें,