पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी फळ । हें भजावया मिसे केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ ९६ ॥ म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करी । तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंवें मातें ॥ ९७ ॥ यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि दवासि यत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥ सम० -- करिसी जें भक्षिसी जें जें देसी होमिसील जें । तपही करिसी पार्था जें तें करें मदर्पण ॥ १७ ॥ आर्या - जें करिशी जें खाशी जें होमिशि तपिश आणि जें देशी । तें मज क रिं अर्पण तूं हा मी श्रीकृष्ण नुजचि उपदेश ॥२७॥ ओवी - जें करण आणि भक्षणं । जें अनीसी होम करणें । जें तप तप साधनें । तें मज अर्पण करीं ॥ २७ ॥ जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी । अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥ ९८ ॥ ना तरी पात्रविशेपें दानें । कां सेवकां देसी जीवनें । तपादि हन साधनें । व्रतें करिसी ।। ९९ ।। तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें । तें भावना करूनि करावें । माझिया मोहरां ॥ ४०० ॥ परि सर्वथा आपुले जीवीं । केलियाची से कांहींचि नुखीं । ऐसी धुवोनि कम द्यावीं । माझिया हातीं ॥ १ ॥ शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः । संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥ सम०—फळां बया वाइटांहीपासुनी सुटसी असा । या संन्यासें युक्तचित्त मुक्त तूं मज पावसी ॥ २८ ॥ आर्या- तेणें त्यजिसी पार्था शुभाशुभ फलाख्य कर्म-बंध मला । संन्यास योग-युक्तहि पावसि होऊनि मुक्त तूं अमला ॥२८॥ ओवी - शुभाशुभ फळ । कर्मबंध सुटे सकळ । संन्यासयोगयुक्त होऊनि केवळ | तूं मज पावसी ॥ २८ ॥ मग अमिकुंडीं बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेविं मुकलीं । तेविं न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभं ॥ २ ॥ अगा कम जें उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें । आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥ ३ ॥ तें पुष्प, फट, अशा सामान्य वस्तू केवळ भाक्त दाखविण्याचें एक साधन आहेत. आम्हांला खरोखर या निमित्तसाधनांशीं कांहींच कर्तव्य नाहीं. आमचा मुख्य आधार, खरी मख्खी, 'भक्तितत्त्व ' हीच आहे. ९६ म्हणून, अर्जुना, ही गोष्ट साधण्याची सोपी युक्ति सांगतों तिच्याकडे लक्ष दे. हे साधावयाचे असेल, तर तूं आपल्या मनामध्ये माझा विसर कधींही पडूं देऊं नकोस. ९७ तूं जीं जीं कर्मै करशील, किंवा विषय भोगशील, किंवा यज्ञ संपादशील, ९८ किंवा एकाद्याला दाने देशील, किंवा चाकरमाणसांच्या निर्वाहाची सोय लावशील, किंवा तपें, व्रतें, इत्यादि आचरशील, ९९ त्या त्या समग्र क्रिया, जशा जशा सहज घडतील, तशा तशा सर्वस्वी माझ्याच उद्देशाने मला समर्पण कर. ४०० परंतु असें करतांना त्यांत अहंकाराचा लेशही असतां कामा नये; अशा प्रकारें अहंकारदोष धुऊन काढून निर्मळ केलेली कर्मों मला अर्पण करण्यांत यावी. १ मग, अग्निकुंडांत भाजून काढलेले वीं जसें कधीं अंकुरावस्थेला येऊं शकत नाहीं, तसें मला अर्पण केलेले कर्म कधीही फळ पसवत नाहीं, म्हणजे तें कर्म आपल्या फळाने कर्त्याला बंधक होत नाहीं. २ अर्जुना, कर्म जेव्हां शिल्लक राहते, तेव्हांच त्याचें फळ उत्पन्न होतें, आणि तें फळ भोगण्याकरितां १ निमित्त. २ सोपी, ३ निर्वाहाच्या सोयी. ४ वाटेला, कडेस ५ स्मरण.