पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २९१ सोजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥ ८५ ॥ परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखे । तैसें पत्रचि परि तेणें सुखें | आरोगूं लागे ॥ ८६ ॥ अथवा ऐसेंही एक घडे । जे पालाही परी न जोडे । तरि उदकाचें तंब सांकडें | नव्हेल कीं ॥८७॥ तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें । तेंचि सर्वस्व करूनि अर्पिलें । जेणें मज ॥ ८८ ॥ तेणें वैकुंठापासोनि विशाळें । मजलागीं केलीं राउळें । कौस्तुभाहूनि निर्मळें । लेणीं दिवली ॥ ८९ ॥ दुधाची सेजारें । क्षीराब्धी ऐसी मनोहरें । मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥ कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु | मज हांतिवा लाविला दिनकरू | दीपमाळे ।। ९९ ।। गरुडासारिखीं वाहनें । सुरतरूंचीं उद्यानें । कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥ ९२ ॥ मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिलीं बहुवसें । ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोपें गा ॥ ९३ ॥ हें सांगावें काय किरीटी । तुवांचि देखिलें आपुलिया दिठी । मी सुदामयाचिया सोडीं गांठी । पव्हयांसाठीं ॥ ९४ ॥ पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे । आह्मी भावाचे पाहुणे | भलतेया ॥ ९५ ॥ येर पत्र पुष्प तें ताजें आहे कीं, सुकलेलें आहे हें पाहात न बसतां, तें प्रेमरसानें भरलें आहे इतकेंच मी पाहातों, आणि मग भुकेलेल्या मनुष्यानें जसें अधाशीपणानें अमृत पिऊन संतृप्त व्हावे, तसें तें पानच खाऊन, त्या सुखानें मी पुत्र होऊं लागतो. ८५,८६ किंवा एकादे प्रसंगीं कोठें पालाही मिळत नाहीं असें घडेल, परंतु पाण्याला तरी कोठेही तोटा नसतो ना ? ८७ तें कोणत्याही ठिकाणी मोल न देतां मिळते; पण तेंच मोफत मिळालेले पाणी माझा भक्त मला आपलें सर्वस्व म्हणून अर्पण करतो, ८८ आणि या अल्पसमर्पणानेही मला असें वाटतें कीं, त्या भक्तानें मला जणूं काय वैकुंठापेक्षांही मोठीं देवळें बांधून दिली; किंवा कौस्तुभापेक्षांही निर्मळ तेजाचीं जडावाची लेणीं माझ्या अंगावर चढविलीं; ८९ किंवा क्षीराब्धीहूनही सुखकर अशीं नवींच दुधाचीं असंख्य शय्यास्थानें त्याने माझ्यासाठी निर्माण केली; ३९० अथवा कापूर, चंदन, आणि कृष्णागरू, या तीन वस्तूंचा सुगंधमय अत्युच्च मेरु माझ्या उपभोगार्थ उत्पन्न केला; किंवा माझ्या दीपमाळेवर त्यांनी दुसरा सूर्यच अशी काडवात लाविली; ९१ किंवा त्यानें गरुडासारखी वाहनें अथवा प्रत्यक्ष कल्पवृक्षांच्या बागा, अथवा कामधेनूंची खिल्लारेंच मला अर्पण केलीं, ९२ किंवा अमृतापेक्षांही स्वादिष्ट अशीं नाना प्रकारची दिव्य पक्वान्नें त्यानें मला वाढली; इतका अपरंपार संतोष मला भक्तांनी अर्पण केलेल्या पाण्याच्या थेंबाने होतो. ९३ अर्जुना, हें मी तुला सांगितलेच पाहिजे असें नाहीं. अरे, भक्तीच्या तीन मूठी पोह्यांसाठीं मी आपण होऊनच सुदाम्याच्या पुरचुंडीच्या चिंध्यांच्या गांठी आपल्या हाताने सोडल्या, तो प्रसंग तर तूं प्रत्यक्षच पाहिला आहेस. ९४ मी एक भक्ति मात्र पाहातो, मग तेथे लहान मोठा ही भेदकल्पना कधींच करीत नाहीं. खरा भाव इटीस पडला म्हणजे आम्ही कोणाचाही कसाही पाहुणचार असला तरी तो प्रेमानं स्वीकारतों. ९५ खरें म्हटलें, तर पत्र १ ताजें, २ पुष्ट होऊं लागतों. ३ काडवात,