पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९० सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ७६ ॥ मग सर्वस्वें करूनि सेवा | अभिमानु सांडूनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया देवा । पात्र जाहाली ।। ७७ ।। म्हणोनि थोरपण पन्हां मांडिजे । एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी ॥ ७८ ॥ अगा सहस्रकिरणाचिये दिठी | पुढां चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत कां हुटहुटी । आपुलेनि तेजें ।। ७९ ।। तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हैं दरें | केविं जाणों लाहे ॥ ३८० ॥ यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचे लोण उतरिजे । संपत्तिमदु - सांडिजे । कुरवंडी करुनी ॥ ८१ ॥ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥ सम०—पत्रे पुष्पें फळे पाणी जो जें अपल भक्तिनें । तें भक्षितों में निष्कामें भक्तिनें मज अर्पिलें ॥ २६ ॥ आर्या - फल फूल - दल - जलेंही जो मातें करुनि भक्ति अर्पित से । भक्तीनें आणियले तें मी अमृतचि म्हणोनि वर्पित सें ॥ २६ ॥ ओवी - पत्र पुष्प फळ उदक । जे मज देती भक्तिपूर्वक । तें मी अंगीकारी आईक । भक्तिभावैकरूनियां ॥ २६ ॥ मग निःसीमभाव उल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें । फळ एक आवडे तैसें | भलतयाचें हो ॥ ८२ ॥ भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडवीं । मग देंठु न फेडित सेवीं । आदरेंशीं ॥ ८३ ॥ पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें । तें लेखें तरि म्यां तुरंवावें । परि मुखींचि घालीं ॥ ८४ ॥ हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडतें जाहलें । तें आहे, त्या मुख्य नायिका लक्ष्मीचेंही या नारायणाजवळ फारसे महत्त्व नाहीं. ७६ म्हणून, अर्जुना, सर्व जीवभावें सेवा करीत आणि सर्व अभिमान बाजूला सारून, नारायणाचे पाय धुण्याचें भाग्य तिनें प्राप्त करून घेतलें ! ७७ म्हणून सर्व मोठेपणाच्या कल्पना सांडाव्या, ज्ञानाची घमंड सोडावी, आणि ' सर्व जगापेक्षां मी धाकटा आहे,' अशा खऱ्या भावनेने विनयी व्हावें, तेव्हां कोठे माझ्या स्वरूपाजवळ येणें शक्य होतें. ७८ अरे, सहस्रकर सूर्याच्या दृष्टीपुढें चंद्रही फिका पडतो, मग काजव्यानें आपल्या तेजाबद्दल प्रौढीची वटवट कशाला करावी ? ७९ त्याप्रमाणें जेथें लक्ष्मीचा मोठेपणा व शंकराचें तप, यांचीही मात्रा चालत नाहीं, तेथें वेड्याविद्या, दुबळ्या, सामान्य माणसाची कथा ती काय ? ३८० यासाठीं शरीराभिमानाची बळ काढून टाकावी, सर्व सद्गुणांची प्रतिष्ठा उतरलेल्या निंबलोणाप्रमाणें फेंकून द्यावी, आणि संपन्नतेच्या मदाची ओवाळणी करून त्यास नाहींसा करावा. ८१ मग अमर्याद प्रेमरसाच्या भराने जेव्हां तो भक्त कोणत्याही झाडाचें फळ, मला अर्पण करण्याच्या उद्देशानें माझ्याकडे करतो, तेव्हां मी मोठ्या उत्कंठेने दोन्ही हात पुढें करून, त्या फळाचें उही तोडण्याला न थांबतां, तें जसेंच्या तसेंच मोठ्या आवडीनें सेवन करतों. ८२,८३. अर्जुना, भक्तीच्या उत्साहाने जर मला माझ्या भक्तानें एकावें फूल दिलें, तर वास्तविक पाहातां मी तें हुंगावें, परंतु भक्तप्रेमाच्या अतिशयांत वाहवून, मी तें फूलही आपल्या मुखांत घालून चाखतों. ८४ पण फुलाची गोष्ट कशाला ? अरे, भक्तानं जरी मला कोणत्याही भलत्यासलत्या झाडाचें पान अर्पण केलें, तरी,