पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २८९ माझे ठायीं । आपणपेंवीण सौरसु नाहीं । मी उपचारें कवणाही । नाकळे गा ॥ ६७॥ एथ जाणीव करी तोचि नेणे । आंथिलेपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥ ६८ ॥ अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥ ६९ ॥ पाहें पां जाणिवेचेनि वळें । कोण्ही वेदापासूनि असे आंगळें । कीं शेपाहूनि तोंडाळे | बोलके आथी ॥ ७० ॥ तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि - बैहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥ ७१ ॥ करितां तापसांची कर्डसणी । कवणु जवळां ठेविजे शूळपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी | माथां वाहे ॥ ७२ ॥ ना तरी ऑथिलेपणें सरिशी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी | श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥ ७३ ॥ तिया खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं । तरि न होती काय बाहुली | इंद्रादिक तयांचीं ॥ ७४ ॥ तिया नावडोनि जेव्हां मोडिती । तेव्हां महेंद्राचे रंक होती । तिया झाडां जेते पाहती । ते कल्पवृक्ष ।। ७५ ।। ऐसिया जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरींचिया पाइका । ते लक्ष्मी मुख्यनायिका । न मनेचि एथ पावतात. ६६ अर्जुना आत्मस्वरूपाच्या अनुभवावांचून मी कोणासही आवडता होत नाहीं. मी कोणत्याही अन्य उपायानें कोणासही साध्य होऊं शकत नाहीं. ६७ या विषयांत जो ज्ञानाचा गर्व वाहातो, तोच अज्ञानी समजावा, जो आपली प्रतिष्ठा मिरवितो, त्याच्यांत उणेपणा व कच्चेपणा आहे असें जाणावें; 'आम्हीं आतां परिपूर्ण झालों, ' असें जो गर्जेल, त्याला कांहींच महत्त्व नाहीं, अशी खुशाल खूणगांठ मारावी. ६८ त्याप्रमाणेच, अर्जुना, यज्ञयागादिकांची किंवा तपश्चरणाची जी वृथा प्रौढीची वटवट करतात, तिचाही या प्रकरणी काडीइतकासुद्धां उपयोग नाहीं. ६९ अरे असें पहा, कीं, ज्ञानसामर्थ्यात वेदापेक्षां जास्त समर्थ, आणि वक्तृत्वशक्तींत सहस्रवदन शेषापेक्षां जास्त कुशल, असा कोणीतरी आहे का ? ३७० पण तो शेषही माझ्या अंथरुणाखाली दडून बसला आहे. ते वेदसुद्धां 'नेति नेति म्हणत माझ्या स्वरूपाचा यथातथ्यपणें विचार करण्याच्या कामगिरीपासून गोंधळलेल्या अवस्थेत मागें मुरडतात. अरे, या प्रकरणानें सनकादिक ज्ञातेही गांगरून वेडे पिसे झाले आहेत. ७१ तपश्चरणाचा विचार केला तर शूपाणि शंकराएवढं कोणाचे दांडगें तप आहे ? परंतु तो तपस्वीश्रेष्ठ शंकरही सर्व अभिमान बाजूला सारून माझ्या पायांचे तीर्थ मस्तकीं धारण करतो. ७२ लक्ष्मीसारखी संपन्नतेंत कोण श्रेष्ठ आहे ? श्रीदेवीसारख्या दासी लक्ष्मीच्या घरीं रावतात. ७३ त्यांनी सहज भातुकलीचा खेळ खेळतांना घरकुलीं केलीं, त्यांनाच लोक अमरपुरी म्हणतात ! मग इंद्रासारखे देवाधिपति हीं त्यांची बाहुलीच ठरत नाहींत का ? ७४ त्यांना खेळाचा कंटाळा येऊन, त्या जेव्हां हीं घरकुलीं मोडतात, तेव्हां महेंद्रादि सर्व भणंगाच्या स्थितीला येतात. त्या ज्या झाडांकडे पाहतात तीं सर्वच झाडें कल्पवृक्ष होतात. ७५ अशा प्रकारचें अलौकिक सामर्थ्य जिच्या घरीं तैनातींत रावणाऱ्या परिचारिकांनाही १ परिपूर्ण अवस्था, २ घमेंड, ३ अधिक. ४ वक्ता. ५ मार्गे मुरडतो. ६ विचार, गणती. ७ संपन्नतेंत. ८ समीपवर्ती, सेनातीस असणान्या. ३७ ,