पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी चित्तें । जीवित सरलियां तयांतें । पितृत्व वरी ॥ ५६ ॥ कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियंचि जयांची परमदैवतं । जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥ ५७ ॥ तयां देहाची जैवनिका फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ति जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्मे तयां ॥ ५८ ॥ मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला । मीचि मनीं भाविला । वानिला वाचा ॥५९॥ सर्वांगीं सर्वांठायीं । मीचि नमस्कारिला जिहीं । दानपुण्यादि जें कांहीं । तें माझियाचि मोहरां ।। ३६० ॥ जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतवाहेरि मियांचि धाले । जयांचें जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥ ६१ ॥ जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूपावयालागीं । जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभे ॥ ६२ ॥ जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम | नेणती लोक || ६३ || जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोड़ें जयांचेनि मंत्रे | ऐसे जे चेष्टामात्रें | भजले मज ॥ ६४ ॥ ते मरणाऐलीकडे | मज मिळोनि गेले फुडे । मग मरणी आणिकीकडे | जातील केवीं ॥ ६५ ॥ म्हणोनि मद्याजी जे जाहाले । ते माझियाची सायुज्या आले । जिंहीं उपचारमिपें दिधलें । आपण मज ॥ ६६ ॥ | मैं अर्जुना पितृस्वरूप होतात. ५६ अथवा, वेताळादि पिशाच व हीन ग्राम्य देवता हींच ज्यांना श्रेष्ठ दैवतें वाटतात, आणि जारणमारणादि मंत्रांकरितां जे त्यांची उपासना अंगीकारतात, ५७ त्यांचा देहाचा पडदा मृत्यूनं दूर सारला, की लगेच ते भूतयोनीला जातात. अशा प्रकारें त्यांच्या संकल्पाप्रमाणेंच त्यांना त्यांच्या कर्माचें फळ लाभतें. ५८ मग, ज्यांच्या डोळ्याला माझें दर्शन झालें आहे, कानांला माझें श्रवण घडलें आहे, आणि ज्यांनीं मनानें माझें ध्यान केलें आहे, वाचेनें माझी कीर्ति गायिली आहे; ५९ जे सर्व अंगांनीं सर्व ठिकाणीं माझ्या उद्देशानेच नमन करतात आणि आपण आचरलेलें दान, पुण्य, इत्यादि सर्व कांहीं माझ्या प्रीत्यर्थच करतात; ३६० ज्यांनी माझाच अभ्यास केला आहे, जे अंतर्बाह्य मद्रप होऊन समाधान पावले आहेत, आणि ज्यांनीं आपलें जीवितसर्वस्व मलाच अर्पण केलं आहे; ६१ जे केवळ हरिभक्ताचीं लक्षणें धारण करण्याकरितांच अहंपणा स्वीकारतात, व ज्यांना केवळ माझा एकट्याचा लोभ जडलेला असतो; ६२ जे केवळ माझ्या प्राप्तच्या इच्छेमुळेच सकाम असतात. जे माझ्याच प्रेमानं प्रेभव्याकुळ होतात, आणि माझ्या सर्वव्यापी स्वरूपानें भारल्यामुळे ज्यांना लौकिक भाव भासमानही होत नाहीं; ६३ ज्यांचीं शास्त्रे व मंत्रतंत्रे सर्व माझ्या प्रीत्यर्थच असतात; एकंदरीत जे आपल्या दरोबस्त व्यवहाराचारांनी माझें भजन करतात; ६४ ते मृत्यूच्या पूर्वीच माझ्या सत्य, शुद्ध, बुद्ध, अशा स्वरूपास लाभतात, मग ते, मरण प्राप्त झालें असतां, दुसऱ्या एखाद्या ठिकाणीं जाणार तरी कसे ? ६५ म्हणून जे आपल्या सर्व व्यवहारांनी स्वतःलाच माझ्या स्वरूपीं अर्पण करतात, ते माझे याज्ञिक - उपासक - माझ्या स्वरूपालाच १ पडदा. २ वाटेने, उद्देशानें, प्रीत्यर्थ.