पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये || ३९ ॥ आपुली तहान भूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसिचि करणें । तैसे अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करीं ॥ ३४० ॥ तयां माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड | प्रेम सुयें ॥ ४१ ॥ ऐमा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागे तयां देवों । आणि दिवलियाचा निर्वाहो । तोही मीच करीं ॥ ४२ ॥ हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा | जयांचिया सर्वभावा । आश्रयो मी ॥ ४३ ॥ येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३ ॥ सम० - अन्य भक्तहि जे देवां अन्यां भजति भक्तिनँ । माझीच पूजा परि ते होते अविधिपूर्वक ॥ २३ ॥ आर्या-श्रद्धेनें अन्य यजुनि करिती ते अन्यदेवता यजन । तेही मलाच भजती नेणुनियां विधिस मात्र मूर्ख जन ॥२३॥ ओवी - पूजन अन्य देवताठायीं । तेंही माझेच घडे पाहीं । विधिपूर्वक सोई । नाहीं तयांची कीं ॥ २३ ॥ आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें । जे अंमिइंद्रसूर्य सोमाये । म्हणऊनि यजिती ॥ ४४ ॥ तेही कीर मातेंचि होये । कां जे हैं आघवें मीचि आहें । परि ते भेजती उजरी नव्हे । विप पडे ॥ ४५ ॥ पाहें पां शाखा पलव रुखाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींच घापे ॥ ४६ ॥ कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींची होती । आणि इहीं सेविले विपय जाती । एकाचि ठाया ॥ ४७ ॥ तरि करोनि रससोय बरवी । कानी केविं भरावी । फुले आणोनि त्यांच्याकरितां मला करणें अवश्यच झालें. ज्यांना अद्याप पंख फुटले नाहींत, त्या पिलांच्या जीवना- करितांच जणूं काय त्यांची आई पक्षीण जगते. तिला स्वतःची तहानभूक मुळींच भासत नाहीं, तान्ह्याला जें मानवेल, तेंच ती माउली निरंतर करते, त्याप्रमाणेंच जे सर्व भावांनीं माझ्यावर विश्वासून माझे उपासक झाले, त्यांचा सर्व परींनीं मीच सांभाळ करतों. ३९, ३४० त्यांना माझ्याशी एकरूप होणाऱ्या मोक्षाची आवड असेल, तर ती त्यांची आवड मी पुरवितों, किंवा जर त्यांना माझी सेवाच रुचत असेल, तर त्यांना मी प्रेमाची देणगी देतों. ४१ अशा प्रकारें ते जें जें मनांत आणतील तें तें त्यांस वारंवार मी देऊ लागतो. आणि अशा रीतीनें मी त्यांस जें जें देतों, त्याचा सांभाळही त्यांच्याकरितां मलाच करावा लागतो. ४२ हा त्यांचा योगक्षेम मलाच चालवावा लागतो, कारण, त्यांचे सर्व जीवभाव माझ्याच आश्रयाने राहतात. ४३ आतां वेगळे दुसरेही संप्रदाय आहेत, परंतु त्यांना माझें सर्वव्यापक रूप कळत नाहीं. ते अग्नि, इंद्र, सूर्य, सोम, यांना उद्देशून यज्ञ करतात. ४४ ते यज्ञही मलाच पावतात, कारण हें सर्व विश्व म्हणजे मीच आहे. परंतु ही उपासनापद्धति सरळ नाहीं, तर वांकडी आहे. ४५ अरे, असें पहा, झाडाच्या फांद्या व पाने एकाच बीजापासून झालेली नव्हत काय ? पण पाणी घेण्याची क्रिया मूळेंच करतात, तेव्हां मूळांवरच पाणी घालणे योग्य. ४६ किंवा आपलीं दहा इंद्रियें आहेत. तीं सर्व एकाच देहांत असतात, आणि त्यांनीं सेविलेले विषयही अखेर एकाच ठिकाणी जातात. ४७ तरी पण अन्न १ यांच्या माझ्यामध्ये २ व्यापकत्वाने ३ सोमाय = सोमाकरितां ४ उपारानारीति ५ सरळ, ६ वांकड़ी.