पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २८५ अमरपण तें बावो जालें । अंतीं मृत्युलोकु || ३३० ॥ मातेचिया उदरकुहरीं । पनि विष्ठेच्या दारीं । उकड़नि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३१ ॥ अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें | वेदज्ञाचें ॥ ३२ ॥ अर्जुना वेदविद जही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला । कण सांडूनि उपणिला | कोंडा जैसा ॥ ३३ ॥ म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥ ३४ ॥ अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥ सम० -- अन्य टाकूनि मातेंची चिंतिती भजती जन । जे नित्ययुक्त त्यांचा तो मी योग-क्षेम वाहतों ॥ २२ ॥ आर्या - चिंतुनि अनन्य मातें सेविति जन नित्य युक्त ते जाण । योगक्षेम तयांचा पार्था मी वाहतों तुझी आण ॥ २२ ॥ ओवी - अन्य ठायीं मन न घालिती । मम उपासना जे करिती । त्यांचा योगक्षेम निश्चित करणे मज पडे ॥२२॥ पैं सर्वभावेंसी रेखितें । जे वोपिले मज चित्तें । जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ॥ ३५ ॥ तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणेया ठेविलें ॥ ३६ ॥ ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतित सांते मातें । जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं ॥ ३७ ॥ ते एकवटूनि जिये क्षणी । अनुसरले गा माझिये वाहणीं । तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥ ३८ ॥ मग तिहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें । ओळखतां पुण्यकृत्यांनीं स्वर्गभोग मिळविले, त्यांना खरें अमरपण नाहींसं होतं, आणि ते अंतीं मृत्युलोकालाच येतात. ३३० आईच्या गर्भाशयांत घाणीच्या उकाड्यामध्ये नऊ मासपर्यंत उकडत राहून ते वारंवार जन्माला येतात आणि पुन्हां मरण पावतात. ३१ अरे, स्वप्नामध्यें द्रव्यठेवा पाहावा, पण तो जसा जागृतींत सर्वथैव नाहींसा होतो, तसेंच हे वेदज्ञांना मिळणारें स्वर्गसुख खोटें समजलें पाहिजे. ३२ अर्जुना, धान्यकण वेगळे केले, म्हणजे शिल्लक राहिलेला कोंडा वारवला तरी वायफळच ठरतो, त्याप्रमाणे एकादा पुरुष जरी वेदवेत्ता झाला, तरी जर त्याला माझ्या शाश्वत स्वरूपाचे ज्ञान झालं नसेल, तर तो फुकटच गेला असें समजावें. ३३ म्हणून माझें एकट्याचें ज्ञान झाले नसेल, तर सारे वेदोक्त धर्म निरुपयोगी ठरतात; परंतु तूं माझें सत्स्वरूप जाणलेंस आणि मग जरी तुला इतर कसलेही ज्ञान घडले नसले, तरीही तूं सुखी होशील. ३४ ज्यांनीं संपूर्ण मनोभावानें आपल्या स्वतःला मला अर्पण केलें; जसा गर्भाशयांतील पिंड कोणताही उद्योग जाणत नाहीं, तसेच जे माझ्यावांचून दुसरें कांहींही चांगले समजत नाहींत, आणि जे समग्र जीवितालाच माझ्या नांवाने ओळखतात; ३५, ३६ अशा रीतीने एकाग्रनिप्रेनें जे माझें चिंतन करतात आणि माझी उपासना करतात, त्यांची मीच सेवा करीत राहतों. ३७ जेव्हां त्यांनी सर्व जीवाभावाचं एकीकरण करून माझ्या उपासनेचा मार्ग अंगीकारला, तेव्हांच त्यांची सर्वपरींनी सुव्यवस्था लावण्याची काळजी मला जडली. ३८ मग त्यांनीं जें जें केलें पाहिजे, तें तें १ उकाज्यांत. २ वारवून वेगळा केला. ३ निरुपयोगी. ४ उक्ते, सगळेच्या सगळे,