पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कामधेनुंचीं ॥ २१ ॥ जेथ वोळगे देव पाइका । मेघ चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥ २२ ॥ गंधर्व गात गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी | उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया || २३ ॥ मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांवरें । पवना ऐसे म्हणियारे । धांवणे जेथ ॥ २४ ॥ पैं बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तिश्रियेचे ब्राह्मण । भाटिये सुरगण | बहुवस जेथें ।। २५ ।। लोकपाळ रांगेचे । राउत जिये पदवीचे | उच्चैःश्रवा खाँचे । खोल॑णिये ॥ २६ ॥ हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रमुखासरिसे । ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥ २७ ॥ ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥ सम० - ते भोगुनी स्वर्गसुखासि अंतीं या मृत्युलोकीं परतोनि येती । प्रपन्न जे ये रितिं वेदधमीं गतागती पावति काम-कामी ॥ २१ ॥ आर्या-स्वर्ग बहु दिन भोगुनि येती पुण्यक्षय क्षितीला ते । एवं श्रुति-धर्मानें सकाम पावति गतागत-फळातें २१ ओंवी—ते स्वर्गी वास करिती । क्षीणपुण्ये मृत्युलोका येती । मायिक धर्म आचरिती । कामी काम ॥ २१ ॥ मग तया पुण्याची पॉउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उंटी उतरे। आणि येऊ लागती माघारे । मृत्युलोका ॥ २८ ॥ जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ॥ २९ ॥ एवं थितियां मातें चुकले । जिहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां महासिद्धींचे संग्रह, अमृताचे सांठे, आणि कामधेनूंचीं खिल्लारे असतात. २१ तेथें देव सेवेला हजर, जमिनीला फरसबंदी चिंतामणीच्या खड्यांची, आणि कल्पतरूंचीं जिकडे तिकडे क्रीडोपवनें. २२ तेथें गंधर्व गातात, रंभेसारख्या अप्सरा नाचतात, आणि उर्वशीप्रभृति विलासिनी स्त्रिया लाभतात. २३ तेथें शय्यागारीं प्रत्यक्ष मदन वावर करतो, चंद्र आंगण शिंपतो, आणि वायूसारखे हरकामे सारखे धावत पळत असतात. २४ ज्यांत स्वतः बृहस्पति मुख्य आहे असे तेथें स्वस्तिवाचन करणारे ब्राह्मण असतात, आणि भाटांचें काम करण्याला वाटेल तेवढे देव मिळतात. २५ तेथें लोकपाळ हे रांगेने उभे राहणारे उमदे शिलेदार असतात, आणि जेथें उच्चैःश्रव्यासारखा कोतवालघोडा आहे. २६ असो, अशा प्रकारचे इंद्रसुखासारखे अनेक सुखभोग ते गांठीं पुण्य असेपर्यंत उपभोगितात. २७ मग कमावलेल्या पुण्याईच्या पायठणीचा आधार सुटतो, आणि लागलीच इंद्रपदाची हळद उतरते आणि पुन्हां परत मृत्युलोकाला पावतात. २८ ज्याप्रमाणं एकादा व्यसनी माणूस वेश्येच्या नादाने सर्व पैका उधळून टाकतो, आणि मग त्या दरिद्री अवस्थेत त्याला त्या वेश्येच्या दारावर नुसती थापही मारणं अशक्य होतें, त्याप्रमाणेच पुण्यसंग्रह सरल्यावर या यज्ञकर्त्यांची जी लज्जास्पद अवस्था होते, तिचे काय वर्णन करावें ? २९ अशा प्रकारें ज्यांनीं मला, शाश्वत आत्म्याला न १ बायका. २ हरकामे, निरोपे ३ पुढे चालणारा कोतवालघोडा, ४ पायरी, पावठण, ५ उटी, हळद. ६ पैका ७ यज्ञ- कर्त्यांचें ८ शाश्वत असणान्या,