पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २८३ स्वर्गा वरिती ।। ३१० ।। जैसें कल्पतरुतळवटीं । वैसोनि झोळिये देतसे गांठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥ ११ ॥ तैसे शतक्रतु यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखातें । आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ॥ १२ ॥ म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥ १३ ॥ एन्हवीं तरी नरकींचं दुःख | पावोनि स्वर्गा नाम की सुख । वांचूनि नित्यानंद गा निर्दोख । तें स्वरूप माझें ॥ १४ ॥ मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा | स्वर्ग नरकु या वाटा । चोरांचिया ॥ १५ ॥ स्वर्गा पुण्यात्मकें पापें ये जे । पापात्मकें पापें नरका जाइजे | मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ १६ ॥ आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दु-हावें पांडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥ १७ ॥ परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरी ते दीक्षित । यजूनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ १८ ॥ मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे । तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥ १९ ॥ जेथ अमरत्व हैं सिंहासन | ऐरावतासारिखें वाहन । राजधानीभुवन । अमरावती || ३२०॥ जेथ महासिद्धींची भांडारें । अमृताची कोठारें। जिये गांवीं खिल्लारें । करून ज्याला यज्ञ पोचतात त्या मला विसरून, स्वर्गाचा स्वीकार करतात. ३१० जशी एकाद्या दुर्देवी पुरुषानें कल्पवृक्षाच्याखालीं बसून आपल्या झोळीची गांठवण करावी आणि मग भीक मागण्याकरितां भटकावें, ११ तसेच हे शेंकडों यज्ञांनीं मला उपासितात, आणि मग स्वर्गसुखाची वासना ठेवतात, तेव्हां हें खरोखर पुण्यच, पाप नाहीं, असें कसें म्हणावें ? १२ म्हणून मला सोडून स्वर्ग जोडावा, हा अज्ञानाचा पुण्यमार्ग आहे, पण ज्ञानी पुरुष याला नुसता उपद्रव म्हणजे कल्याणाची हानीच समजतात. १३ खरें म्हटलें, तर नरकांतील दुःख पाहूनच लोक स्वर्गाला सुख समजतात; पण खरोखर माझें स्वरूप हैं एकच दोपहीन व अविनाशी आनंदसुख होय. १४ वीरश्रेष्ठा अर्जुना, मजप्रत येण्याच्या मार्गात जे दोन आडवाटांचे अडथळे आहेत, ते हेच. स्वर्ग व नरक या वाटा चोरट्यांच्या आहेत. १५ पुण्यमिश्रित पापाने स्वर्गाला पावावें, निर्भेळ पापाने नरकाला जावें, आणि शुद्ध निर्दोष पुण्यानं मला पांचायें, हा नियम आहे. १६ आणि माझ्याठायींच असून, ज्याच्या योगानं मी जीवाला दुरवतों, अर्जुना, त्याला पुण्य हें नांव देतांना या जिभेचे शतशः तुकडे होणार नाहींत काय ? १७ पण हे विषयांतर पुरे. आतां चालू विषयाकडे वळूं. याप्रमाणे ते यज्ञकर्ते यज्ञानें माझी उपासना करून स्वर्गभांगाची याचना करतात. १८ मग ज्याने माझी प्राप्ति होऊं शकत नाहीं, अशा आपण आचरलेल्या पापरूप पुण्याच्या सामर्थ्याने ते स्वर्गलोकास पावतात. १९ त्या स्वर्गात अमरपणा हेच सिंहासन आहे. बसावयाला ऐरावत, राहायला राजधानी अमरावती. ३२० तेथें १ आडवाटा २ सामर्थ्यानें,