पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सुकती । रश्मि वातीवीण न देखती । तैसे मीचि ते मी नोहती । विस्मो देखें ॥ १ ॥ हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । की कैसें कर्म तयां आड आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥ २ ॥ परि अमृतकुहां पडिजे । कां आपणपयातें कडिये काढिजे । ऐसें आथी काय कीजे | अंप्राप्तासि ||३|| ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी | आढळला चिंतामणि पायें लोटी | आंधळेपणें ॥ ४ ॥ तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे । म्हणोनि कीजे तें केलें नोहे | ज्ञानेंविण ॥५॥ आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती । तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंविण ॥ ६ ॥ विद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गति प्रार्थयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमनन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥ सम० --- इंद्रादिरूपें बहुधा यजूनी मातेंचिही वेदिति सोमपानी। पवित्रते पावुनि इंद्रलोकीं निमग्न होती सुर भोगपंकी २० आर्या - वैदिक सोमप अनघ स्वर्गति इच्छिति यजोनि यागातें। इंद्र-भुवनिं त्या पुण्यें भोगिति ते दिव्य देव-भोगांतें ॥२०॥ ओवी - ते ज्ञाते सोमपान करिती । स्वर्गलोक पावावया इच्छिती । तेणें पुण्यें इंद्रलोकीं पावती । दिव्य देवभोग ॥ २० ॥ देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥ ७ ॥ यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके । क्रिया फळेस उभी ठाके | पुढां जयां ॥ ८ ॥ ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरूप । तिहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें ॥९॥ श्रुतित्रयातें जाणोनी । शतवरी यज्ञ करूनी । यजिलिया मातें चुकोनी | तरंगांनी पाणी नाहीं म्हणून सुकावें, किंवा किरणांनी दिवा नाहीं म्हणून आंधळे व्हावें, तसेच ते मद्रूप असतांही 'मी नाहीं ' म्हणून भ्रांत होतात, हें आश्चर्यच नव्हे काय ? १ मी या सर्व विश्वाला सबाह्यांतर व्यापून आहे, हे सर्व जग माझीच मूर्ति आहे, पण या दुर्भाग्यांचें दैव असें आड येतें कीं ते 'मीच नाहीं, ' असें म्हणतात. २ पण अमृताच्या विहिरींत पडावें आणि मग स्वतःला त्यांतून काढून कांठावर आणावें, तसाच प्रकार हा आहे; तेव्हां अशा अभाग्याला काय करावें ? ३ अर्जुना, घांसभर अन्नाकरितां आंधळा तांतडीने धावत असतां, पायाला लागलेला चिंतामणि आंधळेपणानें बाजूला लोटतो, ४ तशीच अवस्था ज्ञान झाले नसलें म्हणजे जीवाची होते; म्हणून, जें केलें पाहिजे, तें ज्ञानावांचून घडत नसतें. ५ आंधळ्या गरुडाला पंख आहेत, पण ते काय कामाला येणार ? त्याप्रमाणेच ज्ञानावांचून सत्कर्माचे आयास वायां जातात. ६ अर्जुना, लक्षांत घे, कीं, आश्रमधर्माप्रमाणे आचार करून जे सदाचाराची कसोटीच होतात; ७ ज्यांची यज्ञक्रिया पाहून वेदत्रयीसुद्धां संतोपानें मान डोलविते; आणि यजनक्रियेचें फळ ज्यांच्यापुढें मूर्तिमंत उभे राहते; ८ असे जे सोमपान करणारे यज्ञकर्ते, जे स्वतःच यज्ञरूप होतात, त्यांनीं पुण्याच्या नांवानें पापच जोडलें, असें समजावें. ९ कारण ते वेदत्रयाचे पठण करून, आणि शेंकडों यज्ञ १ अमृताच्या विहिरींत. २ अभाग्याला ३ श्रम, आयास. ४ कारण.