पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा ૨૮૧ सृष्टिक्षयप्रभवा । मूळ तें मी || ११ || वीज शाखांतें प्रसवे । मग तें रूखपण बीज सामावे । तैसें संकल्प होय आघवें । पाठीं संकल्पी मिळे ॥ ९२ ॥ ऐसें जगाचें वीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारूपु । तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें स्थान मी ॥ ९३ ॥ इयें नामरूपें लोटती । वर्णव्यक्तीं आटती । जातीचे भेद फिटती । जैं आकारु नाहीं ॥ ९४ ॥ तैं संकल्पवासनासंस्कार । माघौतें रचावया चराचर । जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥ ९५ ॥ तपाम्यहमहं वर्षे निगृह्णाम्युत्सृजामि च । अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९ ॥ सम० – तपतों वर्षों वृष्टी वोढितों मीच सोडितों । मोक्ष मी मृत्यु मी मीच जडचैतन्य अर्जुना ॥ १९ ॥ आर्या - रविरूपें तपतों मी रस आकर्षोनि वृष्टि वोपित सें । अमृतहि मी मृत्युहि मी धरितों मी स्थूल सूक्ष्मरूप तसें ॥१९॥ ओंवी — उत्पत्ति प्रलयस्थान । मीच असें सर्वांचे कारण । मोक्षकाळ मी जाण । सदसत् मीच असें ॥ १९ ॥ मी सूर्याचेनि वेपें । तपें तें हैं शोपे । पाठी इंद्र होऊनि वर्षं । तें पुढती भरे ।। ९६ ।। अमि काष्ठे खाये । तें काष्टचि अग्नि होये । तैसें मरतें मारितें पाहें । स्वरूप माझें ॥९७॥ यालागीं मृत्यूच्या भागीं जें जें । तेंही पैं रूप माझें । आणि न मरतें तंव सहजें । मीचि आहें ॥ ९८ ॥ आतां बहु बोलोनि सांगावें । तें एकीळां घे पां आघवें । तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥९९॥ म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचे दैव कैसें । जे न देखती मातें ॥ ३०० ॥ तरंग पाणियेवीण आधार आहे, आणि उत्पत्ति, नाश, व पुनरुत्पत्ति, यांनाही मीच मूळ कारण आहे. ९१ बीज शाखांना उत्पन्न करतें; मग सर्व वृक्षपण त्या बीजांतच सांडून राहते, तसेंच सर्व विश्व आदिसंकल्पापासून उद्भवतें, आणि अखेर त्याच संकल्पांत सांडून राहते. ९२ अशा प्रकारचा अमूर्त वासनारूप जो संकल्प जगताचं बीज आहे, तो संकल्प कल्पांती ज्या ठिकाणी परत सांठविला जातो, तें ठिकाणही मीच ९३ जेव्हां नामरूपें नष्ट होतात, व्यक्तीचें विशिष्टत्व लोपतें, जातिवर्गाचे भेदभाव पुसून जातात, आकार मावळतो, ९४ तेव्हां आदिसंकल्पाच्या वासनेचें पुन्हां स्फुरण होईपर्यंत सर्व चराचर ज्या ठिकाणीं सुखरूप असतें, तें ठिकाणही मीच. ९५ सूर्यरूपानं मी ताप उत्पन्न करतों, तेव्हां हें जल आटतें; नंतर मीच इंद्ररूपाने वर्षाव करतो, तेव्हां ते पुन्हां भरते. ९६ अग्नि लांकूड जाळतो, तेव्हां तें लांकूडच अग्नि होतें, त्याप्रमाणें मरणारें व मारणारं हीं दोन्ही माझींच स्वरूपं होत. ९७ म्हणून जें जें मृत्यूच्या स्वाधीन होतें, तेंही माझेंच रूप, आणि जें अमर आहे, तें तर स्वाभाविकपणे मीच आहे. ९८ आतां, लांबलचक वक्तृत्व करून जे सांगावयाचे, तें आतां तुला मी एकदम एका शब्दांत सांगतों, ऐक. सत् आणि असत् म्हणजे अविनाशी आणि विनाशी हे सर्व मीच आहे. ९९ म्हणून, अर्जुना, जेथें मी नाहीं, असें स्थान कोठें बरें आहे ? परंतु प्राण्यांचं दैव असें खोटें आहे, कीं, मी त्यांना दिसतच नाहीं । ३०० ३६