पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० सार्थ श्रीज्ञानेश्वरी भर्ता । मीचि गा एथ पांडुसुता । मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥ ८० ॥ आकारों सर्वत्र वसावें । वायूने नावभरी उगे नसावें । पावकें दाहावें । वर्षावें जळें ॥ ८१ ॥ पर्वतीं वैसका न संडावी । समुद्री रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ ८२ ॥ म्यां वोलविल्या वेदु बोले | म्यां चालविल्या सूर्य चाले । म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥ ८३ ॥ मियांचि नियमिला सांता । काळ ग्रासितसे भूतां । इयें म्हणियागतें पांडुसुता । सकळें जयाचीं ॥ ८४ ॥ जो ऐसा समर्थ । तो मी जगाचा नाथु । आणि गगनाऐसा साक्षीभूतु । तोही मीचि ॥ ८५ ॥ इहीं नामरूपीं आघवा । जो भरला असे पांडवा । आणि नामरुपांचाही बोल्हावी । आपणचि जो ॥ ८६ ॥ । जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळी आधी जळ | ऐसेनि वसवितसे सकळ । तो निवासु मी ॥ ८७ ॥ जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारीं मी जन्ममरण । यालागीं शरणागता शरण्य । मीचि एक ॥ ८८ ॥ मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतिगुणें । जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥ ८९ ॥ जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंबे सविता । तैसा ब्रह्मादि सर्वां भूतां । सुहृद तो मी ॥ २९० ॥ मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि वोलावा । करून गुणांचा उपभोग घेतो, ७९ तो या विश्वलक्ष्मीचा नाथ, अर्जुना, मीच आहे. या समस्त त्रिभुवनाचा मीच शास्ता आहे. २८० आकाशाने अशेष स्थळाला व्यापावें, वायूनें क्षणमात्रही निश्चळ राहू नये, अग्नीनें जाळावें, पावसानें पडावें, ८१ पर्वतांनीं अचळ राहावें, समुद्रानें भरतीची मर्यादा ओलांडूं नये, पृथ्वीनें भूतमात्राचा भार सहन करावा, या सर्व गोष्टी माझ्या आज्ञेनेंच घडतात. ८२ मीं बोलवले, तरच वेद बोलतात. मी चालविला तरच सूर्य चालतो. मी चलन दिलें, तरच जगाला चालविणारा प्राण हालचाल करतो, ८३ मीं नियम घालून दिल्यावरून यम भूतांचा संहार करतो. ज्याच्या सांगण्यावरून हीं सर्व कर्मों घडून येतात, ८४ असा जो या जगाचा सामर्थ्यवान प्रभु, तो मीच; आणि गगनासारखा कांहीं न करतां तटस्थ राहणारा जो, तोही मीच; ८५ अर्जुना, जो या समस्त नामरूपांत भरलेला आहे, आणि जो या नामरूपाला मूलाधार आहे, ८६ जसे पाण्याचे तरंग होतात आणि त्या तरंगांत जळच असतें, त्याप्रमाणें जो या समस्त भौतिक सृष्टीला आधार होऊन राहतो, तो आधारही मीच. ८७ जो मला एकनिप्रेनें शरण येतो, त्याचें जन्ममरण मी चुकवितों, म्हणून शरणागताला ' शरण्य' म्हणजे शरण जाण्यास योग्य असाही मीच एकटा आहे. ८८ मीच अनेकत्व धारण करून प्रकृतीच्या भिन्न भिन्न गुणांच्या द्वारें जित्या जगाच्या प्राणरूपाने कर्म करीत असतो. ८९ हा समुद्र आणि हें चिखलट डबकें, असा भेदभाव मनांत न आणतां सूर्य कोणत्याही जलाशयांत प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून तों मुंगीपर्यंत सर्व भूतमात्रांत सख्यत्वानं राहाणारा तो मीच. २९० अर्जुना, मीच या जगाला १ आधार