पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २७९ मी चराचरीं । माताही होय ॥ २७० ॥ आणि जाहालें जग जेथ राहे । जेणें जीवित वाढत आहे । तें मीवांचूनि नोहे । आन निरुतें ॥ ७१ ॥ इयें प्रकृतिपुरुष दोन्ही । उपजलीं जयाचिया अमनमनीं । तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥ ७२ ॥ आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा । वेदांचिया चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ ७३ ॥ जेथ नाना मतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली । चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥ ७४ ॥ पैं ब्रह्मवीजा जाहला अंकुरु । घोपध्वनि नादाकारु । तयाचें गा भवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ ७५ ॥ जया ॐकाराचिये कुशीं । अक्षरें होती अउमकारेंसीं । जियें उपजत वेदेंसीं । उठिलीं तीन्ही ॥ ७६ ॥ म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु । एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ ७७ ॥ गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् । प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥ सम० गतिपालक मी साक्षी वासस्थान सखा प्रभू । मी सृष्टि-स्थिति-संहार निधि मी बीज नित्य मी ॥ १८ ॥ आर्या-गति मी जगपाळक मी साक्षी आश्रय निवास मी स्वामी । उत्पत्ति-स्थिति- पालन निधान मी मित्र बीज विश्वा मी ॥ १८ ॥ ओवी - मी गति साक्षी पोषक । समस्तां स्थान एक । अधिष्ठान रक्षक । द्रव्यबीज हें जाणणें ॥ १८ ॥ हें चराचर आघवें । जिये प्रकृतीआंत सांठवे । ते शिणली जेथ विसंवे । ते परमगति मी ॥ ७८ ॥ आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये । जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥ ७९ ॥ तो विश्वश्रियेचा त्याप्रमाणें या चराचराची माताही मीच आहे. २७० आणि उत्पन्न झालेलें जग ज्याच्या आधारानें टिकतें व वाढतें, तो आधारही माझ्यावांचून दुसरा खास नाहीं. ७१ ही प्रकृतिपुरुषांची (किंवा शिवशक्तीची) जोडी ज्याच्या सहज संकल्पानें अस्तित्वांत आली, तो त्रिभुवनाचा पितामह म्हणजे आजोबाही मीच आहे. ७२ आणि, हे वीरश्रेष्ठा अर्जुना, समस्त वेगवेगळाले ज्ञानमार्ग अखेर ज्या एकाच चव्हाट्यावर मिळतात; ज्याला 'वेद्य' म्हणजे जाणण्याची वस्तु असें नांव आहे; ७३ जेथें नाना मतांची एक घडी बसते, जेथें निरनिराळ्या शास्त्रांची परस्पर ओळख होऊन त्यांतील भेदभाव नष्ट होतो, जेथें एकमेकांपासून विलग झालेल्या ज्ञानपंथांचा मेळ होतो; ज्याला 'पवित्र' हें नांव देण्यांत येतें; ७४ आणि आदिसंकल्परूपी ब्रह्मबीजाला फुटलेल्या नादस्वरूप घोषध्वनिमय अंकुराचें मूलस्थान जो ॐकार, तोही मीच. ७५ त्या ॐकाराच्या पोढांत असणारी अ-उ-म् हीं जीं तीन अक्षरें वेदांबरोबर उपजलीं, तींही मीच होय. ७६ म्हणजे ऋक्, यजुस्, व साम, हे तीन्ही वेद मीच. अशा प्रकारें सर्व वाङ्मयाची परंपरा म्हणजे मीच आहे. ७० हे सर्व चराचर विश्व ज्या प्रकृतिमायेंत सांठवलें जातें, ती प्रकृतिमाया श्रम पावली म्हणजे ज्याचे ठायीं विश्रांति घेते, तें परमधामही मीच. ७८ आणि ज्याच्यामुळे प्रकृतीला जीवंतपणा येता, आणि ज्याने स्वीकार केला म्हणजे ती हें विश्व प्रसवते, आणि जो या प्रकृतीचा सहवास