पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कवणी के उपासिला नोहें । एथ एके जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥ ६२ ॥ परि तें असो येणें उचितें । ज्ञानयों यजित सांते । उपासिती मातें । ते सांगितले ॥ ६३ ॥ अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं । कीं नेणणें यासाठीं मूखीं । न पविजेचि मातें ॥ ६४ ॥ अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् । मन्त्रोऽहमहमवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥ सम० - विश्वतोमुख ऐसा कीं ऋतु यज्ञ-पितृ व्रतें । मीच मी द्रव्य मंत्राज्य अभि मी हुत होम मी ॥ १६ ॥ आर्या-कीं विश्वमुखी म्हणवुनि यज्ञ ऋतु अग्नि होमिती तूप । मी औषध स्वधा मी पार्था मी सर्व मंत्र गुणरूप ॥ १६ ॥ ओंवी - मीच याग आणि यज्ञ करणें । मीच स्वधाकार औषधी जाण । मंत्र, आज्य आणि अग्नि आदिकरून । हुत मीचि असे ॥ तोचि जाणिवेचा जरी उदयो होये । तरी मुद्दल वेदु मीच आहें । आणि तो विधानातें जया विये । तो ऋतुही मीचि ॥ ६५ ॥ मग तया कर्मापासूनि वरवा । जो सांगोपांगु आघवा । यन्नु प्रगटे पांडवा । तोही मी गा ॥ ६६ ॥ स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा | आज्य मी समिधा | मंत्र मी हवि ॥ ६७ ॥ होता मी हवन कीजे । तेथ अनि तो स्वरूप माझें । आणि हुतक वस्तु जें जें । तेंही मीचि ॥ ६८ ॥ पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः । वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥ सम० - बाप मी माय मी आजा जगाचा धरणार मी । यज्ञ मी शुद्ध ओंकार ऋग्यजुर्वेदसाम मी ॥ १७ ॥ आर्या-विश्वाचा मी धाता पिता पितामहहि मीच साकार । माता वेद्य पवित्रहि ऋक्साम-यजुः श्रुतीहि ओंकार ॥ १७ ॥ ओंवी — मी जगाचा मातापिता । मी पवित्र ॐकार असें तस्वतां । चहूं वेदांचा वक्ता । तो मीच असें ॥ १७ ॥ पैं जयाचेनि अंगसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगें । जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥ ६९ ॥ अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेवीं तर मग माझी उपासना कोणाला आणि केव्हां घडणार नाहीं बरें ? अर्थातच सर्वानाच ती निरंतर घडली पाहिजे. मात्र माझें हें सर्वव्यापक ज्ञान झाले नसल्यामुळे जीव ' अप्राप्त' स्थितींत असतात, म्हणजे ते माझ्या यथार्थ स्वरूपाला प्राप्त होत नाहींत. ६२ पण हा विस्तार पुरे. अशा योग्य ज्ञानयज्ञानें यज्ञ करीत माझी उपासना कशी केली जाते, हें मी तुला सांगितले. ६३ निरनिराळ्या व्यक्तींच्या व साधनांच्या द्वारें जें जें कर्म आचरलें जातें, तें तें सर्व अखेर मलाच अर्पण होते, हें रहस्य मूढ जनांना न कळल्यामुळे, ते माझ्या शुद्ध स्वरूपाला पावत नाहींत. ६४ पण त्या शुद्ध ब्रह्मज्ञानाचा जर उदय झाला, तर मग मुळीं वेदही मीच आहे, आणि त्या वेदानं सांगितलेल्या अनुप्रानविधीनें जो ऋतु करावयाचा तोही मीच. ६५ मग त्या क्रतुकर्मापासून जो यज्ञ यथास्थित व्हावयाचा, तो सर्व अंगोपांगांसह यज्ञही मीच होतों. ६६ स्वाहा स्वधा, सोम इत्यादि औषधी वल्ली, तूप, समिधा, मंत्र, आहुतिद्रव्य, होता, अग्नि, हवन केलेली वस्तु, इत्यादि जें जें यज्ञाला उपकारक होतें, तें तें सर्व मीच आहे. ६७, ६८. ज्याच्या सहवासाने या आठ प्रकारच्या प्रकृतिमायेपासून हें नामरूपात्मक जग उत्पन्न होतें, तो जगताचा पिताही मीच होय. ६९ अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तींत जो पुरुष तोच जसा नारी असतो, १ यज्ञाचें अनुष्टान,