पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २७७ तेविं नानाविधा व्यक्ति । आनानें नामें आनानी वृत्ति । ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ ५२ ॥ येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु वरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणउनी ॥ ५३ ॥ ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ ५४ ॥ पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे | मग विरे अथवा राहे । तन्ही जळाचिमाजीं ॥ ५५ ॥ कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले । आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ।। ५६ ।। तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥ ५७ ॥ अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांची प्रतीति । ऐसे बहुधाकारी वर्तती | बहचि होउनी ॥ ५८ ॥ हें भानुविंव आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया । तैसे ते विश्वा या । समोर सदा ॥ ५९ ॥ अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६०॥ तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तूक तयांचिया सद्भावा । तरी न करितां पांडवा | भजन जहालें || २६१ || एन्हवीं तरी सकळ मीच आहें । तरी त्याप्रमाणें नाना तऱ्हाच्या रूपात्मक वस्तू, त्यांची निरनिराळीं नांवें, त्यांचे निरनिराळे व्यापार, हे सर्व भेद भौतिक विश्वापुरतेच आहेत, परंतु मी सर्वस्वीं भेदभावहीन आहें, असें हे भक्त जाणतात. ५२ अर्जुना, या रीतीनें या भिन्न प्रकारें जे आपल्या ब्रह्मस्वरूपज्ञानाला भेदभावाचा स्पर्श होऊं देत नाहींत, तेही चांगल्या प्रकारचा ज्ञानयज्ञच करतात; ५३ कारण ज्या वेळीं ज्या ठिकाणीं त्यांना जें जें कांहीं दिसतें, तें तें मज परब्रह्मावांचून कांहीं नाहीं, असें ज्ञान त्यांस झालेलें असतें. ५४ असें पहा, जो जो बुडबुडा उत्पन्न होतो, तो तो जलरूपच असतो, मग तो जिरला किंवा उरला, तरी तें सर्व जलांतच घडते. ५५ किंवा वाऱ्याने धुळीचे कण उधळले, तरी त्यांचें पृथ्वीपण लोपत नाहीं, आणि ते खालीं पुन्हां पडले तरी पृथ्वीवरच. ५६ त्याप्रमाणें कोणतीही नामरूपात्मक वस्तू असो, ती टिको किंवा नाशो, ती निरंतर ब्रह्मरूपच असते. ५७ मी जसा सर्वव्यापक आहें, तसाच त्यांचा ब्रह्मानुभवही तितकाच सर्वव्यापक असतो. अशा प्रकारें हें नानाविध विश्व एकविध ब्रह्मच आहे, अशा ज्ञानाने ते व्यवहार करतात. ५८ अर्जुना, हें सूर्यबिंब जसें पाहिजे त्याला त्याच्यासमोरच दिसतें, तसेच या विश्वाला ते ब्रह्मबोधानें व्यापीत असल्यामुळे नेहमी समोरच दिसतात. ५९ अगा पार्था, त्यांच्या ज्ञानांत भेदभाव तिळमात्रही नसतो. वायु जसा गगनांत समत्वानं परिपूर्ण भरून असतो, तसे त्यांचं ज्ञान सर्व विश्वाला समभावानें व्यापितें. २६० माझी जेवढी व्याप्ति, तितकीच समतोलपणें त्यांच्या ब्रह्मवोधाचीही व्याप्ति असते, म्हणून त्यांनीं कांहीं एक न करताही त्यांस माझी उपासना घडते. ६१ जरकरितां मीच सर्वत्र एक एवाद्वितीय आहें,